आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्डरला विलंब झाल्याने लसीला ब्रेक!:एप्रिलमध्ये रोज 29 लाख डोस दिले, मे महिन्यात फक्त 18.2 लाख, लसटंचाईमुळे रोजचे डोस 11 लाखांपर्यंत घटले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावडेकर यांचा दावा : डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना दोन्ही डोस देऊ

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये लसीकरणाची सरासरी गती ठीक राहिली. पण मेमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या घटली. या महिन्यांत ३७% कमी डोस देण्यात आले. या धीम्या गतीने लस देण्यात आली तर देशाच्या ७०% लोकसंख्येला लस देण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण होईल. तथापि शुक्रवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दावा केला की, देशातील १०८ कोटी नागरिकांना डिसेंबर २०२१ पर्यंत दोन्ही डोस देण्यात येतील. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की मे महिन्यात लसीकरणाचा वेग कमी झाला. याच काळात संसर्गही वेगाने वाढला. यामुळे लोक लसीकरण केंद्रामध्ये आले नाहीत. परदेशातून लस खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकल्याने लसींचीही टंचाई होती.

टाइम नियतकालिकाचा दावा : भारताने लसींची ऑर्डर देण्यास विलंब केला
टाइम नियतकालिकाचा दावा आहे की, भारत सरकारने लसींची ऑर्डर देण्यास खूप विलंब केला. सरकारने जानेवारीत सीरम इन्स्टिट्यूटकडून १.१ कोटी आणि भारत बायोटेककडून ५५ लाख डोस खरेदी केले. फेब्रुवारीअखेर सीरमला आणखी २.१ कोटी डोसची ऑर्डर दिली. आणखी डोस खरेदी केले जातील हे सरकारने सीरमला सांगितले नाही. मार्चमध्ये संसर्ग वाढल्यानंतर आणखी ११ कोटी डोसची ऑर्डर दिली. तथापि, लोकसंख्येच्या मानाने ही संख्या खूपच कमी होती. अमेरिका आणि युरोपीय युनियनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच ७० कोटी डोसची ऑर्डर दिली होती. ही संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या गरजेपेक्षा जास्त होती. कॅनडाने जेवढ्या लसींची ऑर्डर दिली आहे त्यातून ते आपल्या लोकसंख्येला पाच वेळा डोस देऊ शकतात.

- मेमध्ये पहिला डोस सरासरी ४७% नी कमी दिले, मात्र दुसऱ्या डोसमध्ये १.६% च वाढ - मंदपणे लसीकरण होत राहिले तर ७०% लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण - लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, मप्र, पंजाबने सुरुवातीला १८+ चे लसीकरण केले नाही. - १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवकांना एक मेपासून डोस देण्यास सुरुवात. त्यांची संख्या ४५ कोटी. १.५ कोटींनाच पहिला डोस मिळाला.

बातम्या आणखी आहेत...