आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरण:दोन दिवसांत 1.39 कोटी डोस, पूर्वी लागत तब्बल 8 दिवस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दिवशी सर्वाधिक 16.91 लाख डोस देणाऱ्या मप्रमध्ये 4825 डोस

देशात लसीकरणाचा वेग थोडा कमी झाला आहे. रात्री १० पर्यंत मंगळवारी ५३.४४ लाख डोस दिले गेले. सोमवारी ८५.९८ लाख डोस दिले होते. यानंतरचा हा मोठा आकडा आहे. या प्रकारे दोन दिवसांत देशात १.३९ कोटी डोस दिले गेले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १६ जून ते २० जून या काळात एकूण दैनंदिन सरासरी १७.७ लाख आहे. म्हणजे पहिल्या दोन दिवसांतच अगोदर आठ दिवसांत दिल्या जाणाऱ्या लसीइतके डोस देण्यात आले.

लसीकरणाच्या महामोहिमेत दुसऱ्या दिवशीही यूपी, गुजरात आणि कर्नाटक टॉप ५ राज्यात आहेत. तर, सोमवारी सर्वाधिक १६.९१ लाख डोस देणाऱ्या मध्य प्रदेशात फक्त केंद्रनिहाय ४,८२५ डोस दिले गेले. याच प्रकारे छत्तीसगड, बिहार, कर्नाटक आणि यूपीमध्ये रोज किमान २०० डोसची क्षमता असताना केंद्रांवर १००हून कमी डोस दिले गेले.

काेव्हॅक्सिनची लस ७७.८% प्रभावी, म्हणजे कोविशील्डपेक्षा जास्त, स्पुटनिकपेक्षा थोडी कमी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात ७७.८% प्रभावी आढळली आहे. कंपनीने डीसीजीआयला तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे आकडे सोपवले. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्याची चाचणी २५,८०० लोकांवर झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोव्हॅक्सिनसाठी फेरमूल्यांकनाचा (ईओआय) प्रस्ताव स्वीकारला आहे.

लसीच्या मंजुरीबाबतची कागदपत्रे सोपवण्याआधी २३ जूनला डब्ल्यूएचओसोबत बैठक व्हायची आहे. तीत कंपनीकडे लसीच्या गुणवत्तेबाबत संक्षिप्त तपशील सादर करण्याची संधी असेल. भारत बायोटेकने गेल्या महिन्यात म्हटले होते की, आम्हाला कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी डब्ल्यूएचओकडून सप्टेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कंपनी आपल्या लसीचे उत्पादन वाढवत आहे. या वर्षाच्या अंतिम तिमाहीपर्यंत कंपनी दरवर्षी १०० कोटी डोसच्या हिशेबाने उत्पादन वाढवण्यावर काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...