आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus News And Updates, Vaccination, Maharashtra ,Madhya Pradesh,,Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 14th June

दिलासादायक बातमी:नवीन संक्रमितांच्या संख्येत मोठी घट, रविवारी देशभरात आढळले 68,362 संक्रमित तर 1.13 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता देशात फक्त 9.72 लाख अॅक्टिव्ह; म्हणजेच आधीच्या 'पीक'पेक्षाही कमी

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी घट झालेली पाहायला मिळाली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात 68,362 नवीन संक्रमित आढळले, तर 1 लाख 13 हजार 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान मृतांच्या आकड्याने चिंता कायम ठेवली आहे. रविवारी देशभरात 3,880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे आता देशात फक्त 9 लाख 72 हजार 577 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हा आकडा मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या पीकपेक्षाही कमी आहे. तेव्हा देशात 10 लाख 17 हजार 705 अॅक्टिव्ह रुग्ण होते. यावर्षी 17 फेब्रुवारीला अॅक्टिव केस 1 लाख 33 हजार 79 पर्यंत पोहोचले होते. येथून दुसरी लाट येणे सुरू झाले. हा आकडा 9 मे रोजी सर्वाधिक 37 लाख 41 हजार 302 वर पोहचला होता. नंतर हळुहळू यात घट होत गेली.