आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Oubreak: Then Forget The Foreign Tour For Vaccinated A Covacin People; News And Live Updates

विदेशवारीवर निर्बंध:आपण कोव्हॅक्सिन घेतलीय..? मग सध्या परदेश दौरा विसरा!; डब्ल्यूएचओच्या यादीत भारत बायोटेकची लसच नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र जालंधरच्या लसीकरण केंद्राचे आहे. येथे शनिवारी लसीचा डोस घेण्यासाठी युवकांनी अशी गर्दी केली. - Divya Marathi
हे छायाचित्र जालंधरच्या लसीकरण केंद्राचे आहे. येथे शनिवारी लसीचा डोस घेण्यासाठी युवकांनी अशी गर्दी केली.
  • मोदींसह अनेक मंत्री, केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतलीय हीच लस
  • देशभरात असे 2 कोटी डाेस दिले गेले, जूनमध्ये काही निर्णय शक्य

एकीकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या बाहेर देशातील लोकांना अनेक देशांनी विमान प्रवासात वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, भारत बायोटेकची “कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांना सध्या विदेशवारीची संधी मिळणार नाही. कारण, ही लसच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) यादीत समाविष्ट नाही. वास्तविक, जगभरातील बहुतांश देश डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट लस घेतलेल्या लोकांनाच व्हिसा देत आहेत. या व्हिसासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सर्वच देशांनी बंधनकारक केले आहे.

या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड, मॉडर्ना, अॅस्ट्राझेनेका, फायझर, जाॅन्सन अँड जॉन्सन आणि सिनोफार्म/ बीबीआयपीच्या लसींचा समावेश आहे. यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे नावच नाही. डब्ल्यूएचओनुसार, या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करावा म्हणून भारत बायोटेकने अर्ज केला आहे. मात्र, डब्ल्यूएचओने याबाबत कंपनीकडून अधिक माहिती मागवली आहे. मे-जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर निर्णय होणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेला आहे. देशभर या लसीचे आतापर्यंत २ कोटी डोस दिले गेले आहेत. विशेष म्हणजे जवळपास सर्वच केंद्रीय मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेला आहे. त्यामुळे आगामी काळात खासगी परदेश दौऱ्यांसह सरकारी परदेश दौऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

दिल्लीने मागितले ८० लाख डोस, मिळाले १६ लाख; आजपासून 18+वरील लसीकरण बंद
दिल्लीत १८ ते ४४ वयोगटासाठीची लसीकरण केंद्रे रविवारपासून बंद केली जातील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्ही ८० लाख डोस मागितले होते, मिळाले फक्त १६ लाख. जूनमध्ये फक्त ८ लाख डोस मिळतील. म्हणून लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. सर्वच राज्यांत ही समस्या आहे. महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडमध्ये या वयोगटासाठीचे डोस जवळपास संपले आहेत.’

देशातच रशियन लसनिर्मिती, सध्या ३० लाखांचा पुरवठा
भारतात रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे उत्पादन ऑगस्टपासून सुरू होईल. रशियातील भारतीय राजदूत डी. बी. वेंकटेशन वर्मा म्हणाले, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारतात या लसीचे ८५ कोटी डोस तयार होतील. मेअखेरपर्यंत ३० लाख डोस रशियातून येत आहेत.

राज्यांकडे १.६० कोटी डोस शिल्लक : केंद्राचा दावा
महाराष्ट्रात पुण्यामध्ये शनिवारी लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद राहिली. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसीचे १.६० कोटी डोस शिल्लक आहेत. राज्यांना आतापर्यंत २१ कोटी डोस देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...