आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासांत 1.01 लाख नवे रुग्ण आढळले, 1.73 लाख बरे तर 2,444 मृत्यू, नवीन संक्रमितांचा दोन महिन्यातील सर्वात कमी आकडा

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 13.98 लाख

कोरोना महामारीची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. कारण कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस घट होत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी 1 लाख 1 हजार 159 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. हा आकडा गेल्या 62 दिवसांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी 96 हजार 563 लोकांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आला होता.

देशात 1.73 लाख रुग्ण बरे झाले असून यात 2 हजार 444 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंचा हा आकडा गेल्या 45 दिवसानंतर अडीच हजारांपेक्षा खाली आलेला आहे. देशात दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 1.01 लाख
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 1.73 लाख
  • 24 तासात एकूण मृत्यू : 2,444
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 2.89 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.71 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.49 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 13.98 लाख
बातम्या आणखी आहेत...