आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 45,695 नवे रुग्ण, 44,506 बरे तर 819 मृत्यू; 56 दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.54 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशात गेल्या 24 तासांत म्हणजे बुधवारी 45 हजार 695 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एका दिवसात 44 हजार 506 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 819 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत बुधवारी 359 ने वाढ झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या 56 दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

तर दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत गेल्या 56 दिवसानंतर पुन्हा वाढ झाली आहे. यापूर्वी 12 मे रोजी 3 लाख 62 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये 3 लाख 52 हजार लोक एका दिवसात उपचार घेत बरे झाले होते. दरम्यान, यादिवशी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 6 हजार 399 ने वाढ झाली होती. त्यानंतर यामध्ये सतत घट पाहायला मिळाली होती.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 45,695
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 44,506
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 819
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.07 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.98 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.05 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.54 लाख
बातम्या आणखी आहेत...