आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Outbreak: A New Virus Can Boost The Immune System; Risk Even After Antibody Development; News And Live Updates

रूप बदलणारा:रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो नवा विषाणू; चिंतेत भर; अँटिबॉडी विकसित झाल्यानंतरही धोका

लंडन / नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी दिल्लीतील बँक्वेट हॉलमध्ये दाखल रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर.
  • विषाणू पहिल्यांदाच एखाद्या विषाणूत आनुवंशिक परिवर्तन

देशातील वाढत्या संसर्गादरम्यान आता नवी चिंता समाेर आली आहे. त्यामागे काेविड-१९ डबल म्युटेशन व्हेरिएंट आहे. देशात वेगाने हाेत असलेल्या संसर्गाला काेविड-१९ चा बी-१.६१७ कारणीभूत आहे, असा संशाेधकांचा दावा आहे. या स्वरूपातील विषाणू शरीराच्या राेगप्रतिकारशक्तीला देखील चकवा देऊ शकताे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. या परिवर्तनामुळे मानवी पेशींना बाधित करून संसर्ग आणखी वाढवण्याची क्षमता वाढवू शकताे. पहिल्यांदाच असा िवषाणू समाेर आला.

भारतात पहिली लाट कमकुवत झाल्यानंतर बेपर्वाई, मास्क व इतर सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. देशातील सर्वात माेठ्या भागात ब्रिटिश विषाणू बी-१.१.७ तसेच दक्षिण आफ्रिकेतील बी-१.३५१, ब्राझील-पी-१ पसरू लागला आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, दिल्ली व कर्नाटकमध्ये आढळून येणाऱ्या बाधितांमध्ये या परदेशातील विषाणूही दिसताे. त्याशिवाय सर्वाधिक चिंता बी-१.६१७ मुळे निर्माण झाली आहे. त्यालाच डबल म्युटेंट असे संबाेधले जात आहे. मूळ विषाणूच्या तुलनेत त्याच्यात १५ म्युटेशन आहेत. त्याच्या स्क्राइप प्राेटीनमध्ये दाेन चिंताजनक म्युटेशन्स- ई ४८४ क्यू, एल ४५२ आहेत. महामारीच्या काळात ते जाेडले गेले.

पहिल्यांदाच एखाद्या विषाणूत अनुवांशिक बदल दिसून आला आहे. भारतात काेविड जीनाेमिक्स कन्साेर्टियमचे सदस्य व व्हायराेलाॅजिस्ट शाहिद जमील म्हणाले, ई ४८४ व एल ४५२ आर वेगाने पसरतात. ते लसीकरण झालेल्या व बाधित लाेकांमधील अँटीबाॅडीला देखील चकवा देऊ शकताे. देशात आता एक टक्क्याहून कमी रुग्णांत जीनाेममधील बदल दिसून येत आहेत. त्यामुळे नेमकी स्थिती अजूनही समाेर येत नाही. आॅक्सफर्ड विद्यापीठात जीनाेमिक्सचे प्राे. अरीस कॅटजाेआर्किस म्हणाले, डबल म्युटेशन विषाणू परिस्थिती आणखी वाईट करू शकताे. म्हणूनच बी. १.६१७ विषाणू लसीकरण झालेल्या व बाधित झाल्याने अँटीबाॅडी तयार झालेल्या व्यक्तींनाही चकवा देऊ शकताे. ही शक्यता नाकारता येत नाही.

अँटिबॉडी विकसित झाल्यानंतरही धोका
वेल्लाेर क्रिश्चियन मेडिकल काॅलेज मायक्राेबायाेलाॅजी विभागाचे प्राेफेसर डाॅ. गगनदीप कंग म्हणाल्या, बी-१.६१७ विषाणूबद्दलचा अभ्यास अतिशय कमी व मंद गतीने सुरू आहे. नेमके करायचे तरी काय? हे ठाऊक नाही. पहिल्या लाटेच्या वेळी आपण काही गाेष्टी केल्या. पुन्हा शांत बसलाे. दुसऱ्या लाटेनंतर आपण हाेताे तेथेच पुन्हा उभे आहाेत.

महाराष्ट्रात ६१ टक्के रुग्ण नव्या विषाणूने बाधित
महाराष्ट्रात या जानेवारीपासून मार्चदरम्यान ६१ टक्के रुग्णांत बी-१.६१७ विषाणू आढळला. पंजाबमध्ये ८० टक्के रुग्ण ब्रिटिश व्हेरिएंटचे आहेत. प्राे. जमील म्हणाले, नवा विषाणू अनेक राज्यांत पसरला आहे. बंगालमध्ये सभा घेतल्या जात आहेत. कुंभमध्ये गर्दी उसळली. देशभरात विषाणू पसरताेय. अशाेका विद्यापीठाचे प्राे. मेनन म्हणाले, भारतीय विषाणू जास्त संसर्ग वाढवताे.

बातम्या आणखी आहेत...