आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Corona (COVID 19) Death Toll India Today 20th May

कोरोना देशात:बुधवारी 2.76 लाख रुग्णांची नोंद, तर 3.68 लाख ठीक झाले; सलग सातव्या दिवशी रिकव्हरी रेट जास्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग सातवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

बुधवारी अॅक्टिव केस म्हणजेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 96,647 ची घट झाली. सध्या देशभरात 31 लाख 25 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 दिवसांपूर्वी, हा आकडा 37.41 लाख होता.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • बुधवारी आढळलेले रुग्ण: 2.76 लाख
  • बुधवारी ठीक झाले: 3.68 लाख
  • बुधवारी झालेले मृत्यू: 3,876
  • एकूण संक्रमित: 2.57 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.23 कोटी
  • एकूण मृत्यू: 2.87 लाख
बातम्या आणखी आहेत...