आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Outbreak: New Patients Fall From 4 Lakh To 1 Lakh Now; News And Live Updates

गोष्ट लाख मोलाची!:नवे रुग्ण 4 लाखांवरून कमी होत आता 1 लाखावर, शिस्त अशीच पाळली तर तिसरी लाट रोखू शकतो : शास्त्रज्ञांचे मत

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना रुग्ण 1 लाखाच्या पातळीवर आले 61 दिवसांत, अमेरिकेत लागले होते 100 दिवस
  • भारतात 4 लाखांची पातळी गाठूनही दुसरी लाट अमेरिकेपेक्षा कमकुवत राहिली, रुग्णही 22.6 लाख कमी

भारतात रविवारी कोरोनाचे १,०१,२६५ नवे रुग्ण आढळले. हा आकडा ७ एप्रिल, म्हणजे ६१ दिवसांनंतर १ लाख झाला आहे. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेत असे होण्यासाठी १०० दिवस लागले होते. त्या हिशेबाने भारताला दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेपक्षा ३९ दिवस कमी लागले. रुग्णही अमेरिकेपेक्षा २२.४ लाख कमी आढळले. अमेरिकेत दुसऱ्या लाटेच्या १०० दिवसांत १.८२ कोटी नवे रुग्ण आढळले, तर भारतात दुसऱ्या लाटेच्या ६१ दिवसांत १.५६ कोटी रुग्ण आढळले आहेत.

नव्या रुग्णांच्या घसरणीचे मोठे कारण संसर्गाच्या दरात (पॉझिटिव्हिटी रेट) ४ पट घट येणे हे आहे. देशात संसर्गाचा ७ दिवसांचा सरासरी दर ६.६ % वर आला आहे, तो एक महिन्यापूर्वी ६ मे रोजी २६ % पर्यंत पोहोचला होता. चांगली गोष्ट म्हणजे २२ राज्यांत संसर्गाचा दर ५% पेक्षा खाली गेला आहे. डब्ल्यूएचओनुसार, जर संसर्गाचा दर ५% खाली असेल तर आता महामारी अनियंत्रित नाही असे मानू शकतो. भारतात आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या मते, मास्क, सहा फूट अंतर आणि जास्तीत जास्त लसीकरणातून तिसरी लाट रोखली जाऊ शकते.

देशात ७५% रुग्ण आता तामिळनाडूसह फक्त ५ राज्यांत आढळताहेत
देशात ७५% नवे रुग्ण आता फक्त ५ राज्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रात आढळत आहेत. या राज्यांत ५ जून रोजी ७९ हजार रुग्ण आढळले होते. याशिवाय सर्व राज्यांत नवे रुग्ण १० हजारांखाली आले आहेत. २८ राज्य-केंद्रशासित प्रदेशांत रोज २ हजारहून कमी रुग्ण आढळू लागले आहेत. मात्र, मृत्यूंची संख्या अजून कमी व्हायची आहे. सध्या रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या २५०० च्या वर कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...