आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना ट्रेंड:दक्षिणेकडील चार राज्यांतच 50% नवे रुग्ण, तेथे देशाची 17% लोकसंख्या; या राज्यांतील संसर्ग घटला तर देशाचा आकडा एक लाखावर येईल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात किंचित दिलासा, मात्र दक्षिणेकडील राज्यांत संसर्ग कायम
  • या राज्यांत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (संसर्गाचा दर) 20% पेक्षा जास्त, याउलट देशाची सरासरी 10%

कोरोनाचा केंद्रबिंदू आता दक्षिण भारताकडे सरकला आहे. देशातील एकूण लोकसंख्येत फक्त १७% वाटा असलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात देशातील ५०% नवे रुग्ण आढळत आहेत. या ४ राज्यांत रोज सरासरी १.०७ लाख, तर देशात २.१५ लाख रुग्ण आढळत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, या राज्यांत देशातील निम्मे रुग्ण सापडत असले तरी मृत्यूचे प्रमाण ३०% पेक्षा जास्त नाही. तज्ज्ञांनुसार, या चार राज्यांत चाचण्यांची सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याने स्वाभाविकपणे येथे जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. देशात रोज १० लाख लोकांमागे १,५९४ चाचण्या होत आहेत. केरळची रोजची सरासरी ४ हजारांपेक्षा जास्त आहे.

डेटात घोळ? स्मशानभूमीत वेटिंग अन् रुग्णालये फुल्ल असताना जेवढे मृत्यू व्हायचे, तेवढेच आताही
अनेक राज्यांत आधी मृत्युसंख्या लपवल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. स्थिती सुधारल्यानंतर मागील आकडे जारी होत आहेत. आता रुग्णालयांत बेड्स रिकामे होत आहेत. स्मशानभूमीत गर्दी नाही. मात्र मृत्युसंख्या कमी होत नसल्याचे दिसते.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २४ लाखांच्या खाली, पैकी निम्मे फक्त चारच राज्यांत अाहेत
देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा २४ लाखांच्या खाली आला आहे. पैकी ५३% फक्त चार राज्यांत आहेत. सर्वाधिक ४ लाख सक्रिय रुग्ण कर्नाटक, ३.१५ लाख महाराष्ट्र, तामिळनाडू ३.१० लाख आणि केरळात २.४८ लाख आहेत. पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहारसह २४ राज्यांत ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

या राज्यांत १ लाखावर रुग्ण आढळत आहेत
नवे रुग्ण (सरासरी) मृत्यू दर लोकसंख्या रोज
तामिळनाडू 35,147 430 20% 2,234
कर्नाटक 26,311 517 22% 2,059
आंध्र प्रदेश 18,408 105 21% 1,707
केरळ 27,232 145 22% 4,071
एकूण 1,07,098 1,197
देशात वाटा 49.8% 29.8%

बातम्या आणखी आहेत...