आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Corona Virus Outbreak Updates: In 24 Hours 49,701 Patients Are Found In Country 27 June 2021; News And Live Updates

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 49,701 प्रकरणे, 57,481 बरे तर 1,255 मृत्यू; गेल्या 15 दिवसांत सक्रिय रुग्णांचा आकडा 5.37 लाखांपेक्षा कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 5.81 लाख

देशात गेल्या 24 तासांत म्हणजे शनिवारी 49 हजार 701 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एका दिवसात 57 हजार 481 लोकांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 1 हजार 255 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे देशातील सक्रिय रुग्णांमध्येही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. शनिवारी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 9 हजार 54 ने घट झाली.

देशात गेल्या 15 दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 लाख 37 हजार 481 ने कमी झाला आहे. यापूर्वी 10 जून रोजी देशात 11 लाख 18 हजार 818 सक्रिय रुग्ण होते. सध्या 5 लाख 81 हजार 337 लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 49,701
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 57,481
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,255
 • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.02 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.92 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.95 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 5.81 लाख
बातम्या आणखी आहेत...