आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश LIVE:देशात आता 7.20 लाख केस, दिल्लीत पहिले 50 हजार रुग्ण होण्यासाठी 110 दिवस लागले तर 50 हजाराचे 1 लाख रुग्ण केवळ 18 दिवसात वाढले 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी 22 हजार 500 रुग्ण वाढले, आतापर्यंत 20 हजार 174 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वात जास्त 9026 जणांचा झाला मृत्यू
  • कर्नाटकचे मंत्री जेसी मधुस्वामी म्हणाले - राज्यात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले आहे, येथे 25 हजारांपेक्षा जास्त केस झाल्या आहेत

देशातील कोरोना संक्रमित संख्या 7 लाख 20 हजार 473 झाली आहे. तर, दिल्लीत सोमवारी रात्रीच्या रुग्णांची संख्यांने एक लाखांचा आकडा ओलांडला. आतापर्यंत 100822 प्रकरण समोर आले आहेत. दिल्लीत पहिला रुग्ण 2 मार्च रोजी आला होता. आधी 50 हजार रुग्ण होण्यासाठी 110 दिवस लागले होते. म्हणजे कोरोना संक्रमणाचा सुरुवातीचा वेग दिल्लीमध्ये मंद होता. मात्र यानंतर केवळ 18 दिवसांमध्ये 50 हजार रुग्ण वाढले. 

दिलासादायक बाब म्हणजे राजधानीमध्ये रिकव्हरी रेट 70 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. संध्या अॅक्टिव्ह केस 25 हजार 620 आहेत. तर 72 हजार 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. येथे आता 17 हजार 141 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 13 हजार 879 एकूण टेस्ट झाल्या आहेत. राजधानीमध्ये आता एकूण 6 लाख 57 हजार 383 टेस्ट झाल्या आहेत.

कर्नाटकचे मंत्री म्हणाले - राज्यात कोरोनाचा कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले आहे 

कर्नाटकात 25 हजारांपेक्षा जास्त संक्रमित झाले आहेत. राज्याचे मंत्री जेसी मधुस्वामी यांनी म्हटले की, कर्नाटकात कोरोनाचे कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले आहे. काही परिसरांची परिस्थिती वाईट आहे. मात्र मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...