आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Updates : So Far 4.40 Lakh Patients, 13 Thousand 548 Patients Increased In 24 Hours

देश कोरोना:संक्रमितांचा आकडा 4.45 लाखांवर; भारतात कोरोनामुळे एक लाख लोकांमागे एकाचा मृत्यू , तर इंग्लँडमध्ये सर्वात जास्त 63 बळी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत देशात 1.78 लाख अॅक्टिव्ह केस, 2.48 लाख झाले बरे, तर 14 हजार जणांचा झाला मृत्यू
  • दिल्लीमध्ये 2909 रुग्ण वाढले आणि सर्वात जास्त 3589 लोकांना डिस्चार्ज
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त 3721 संक्रमित वाढले, 1962 रुग्ण झाले बरे, 113 जणांचा मृत्यू

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 45 हजार 012 झाला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या ताज्या रिपोर्टनुसार इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. डब्ल्यूएचओनुसार, जगभरात दर एख लाख लोकांमागे 6.04 मृत्यू होत आहे. तर, भारतात प्रती एक लाखांच्या लोकसंख्येमागे एकाचा मृत्यू होत आहे.

सर्वात वाईट परिस्थिती इंग्लडची आहे. येथे प्रती एक लाख लोकसंख्येमागे 63.13 मृत्यूदर आहे. स्पेनमध्ये 60.60, इटली 57.19, अमेरिका 36.30, जर्मनी 27.32, ब्राजील 23.68 आणि रशियात 5.62 आहे.

दरम्यान, पंजाब सरकारने हॉटेल्स, रेस्टोरेंट आणि मॅरेज हॉल्स उघडण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी म्हटले की, आम्ही व्यापाऱ्यांची चिंता आणि गृह मंत्रालयाच्या गाइडलाइंस लक्षात ठेवून निर्णय घेतला आहे. राज्यात हॉटेल्स, रेस्टोरेंट्स आणि मॅरेज हॉल्स उघडले जातील परंतू, यात 50 लोक येऊ शकतील. दुसरीकडे, पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्था चटर्जी म्हणाले की, राज्यातील स्कूल आणि कॉलेज 31 जुलैपूर्वी उघडले जाणार नाहीत.

अपडेट्स...

डब्ल्यूएचओने म्हटले की, भारत आणि काही इतर देशातील संक्रमितांचा आकडा वाढला आहे, पण याचे कारण चाचण्यांमधील गती नाही. डब्ल्यूएचओच्या हेल्थ डिझास्टर प्रोग्रामचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉ. माइकल रेयान यांनी सोमवारी ही माहिती दिली. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी देशात उपासमार होऊ शकते अशी भिती व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये अंत्योदय उन्न योजनेनुसार गरजूना दिली जाणार अन्न धान्याची सुविधा जुलै ते सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

राजस्थानच्या बाडीमधून काँग्रेस आमदार गिर्राज सिंह मलिंगा यांच्या पत्नीसह कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान मलिंगा यांनी 16 जूनला त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर ते 19 जूनला राज्यसभा निवडणुकीचे मतदान करण्यासाठी विधानसभेतही गेले होते.

महाराष्ट्रात आयएनएस शिवाजीच्या 8 कॅडेट्सची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

बातम्या आणखी आहेत...