आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona: We Will Not Charge Any Fees From Migrant Workers, 85% Will Be Paid By The Central And 15% By The State Government govt

केंद्र सरकारचे स्पष्टीकरण:प्रवासी मजुरांकडून आम्ही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, 85% केंद्र आणि 15% राज्य सरकार देणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटाच्या काळात मजुरांकडून प्रवासी भाडे घेणे चुकीचे - सोनिया गांधी

देशात सध्या कोरोना महामारीने हाहाःकार माजवला आहे. यादरम्यान प्रवासी मजुरांकडून रेल्वे तिकीट भाडे आकारले जात असल्याच्या बातम्यांनी नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने म्हटले की, आम्ही कधीच मजुरांकडुन भाडे आकारण्याबाबत बोललो नाही. रेल्वे विभाग 85% आणि राज्य सरकार 15% किराया भरणार आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही

माहिती दिली.

यावेळी बोलताना लव अग्रवाल म्हणाले की, 'आम्ही राज्यांच्या मागणीवर विशेष ट्रेन्स चालवण्याची परवानगी दिली. यात आम्ही प्रवासी मजुरांकडून कोणत्याही प्रकारचे तिकीट भाडे वसुल करत नाही. या तिकीटातील 85 % केंद्र सरकार भरणार आहे आणि 15% राज्य सरकारकडून घेण्यात येईल. मजुरांकडून पैसे घेण्यासंबंधी आम्ही काहीच बोललो नाही.' 

संकटाच्या काळात मजुरांकडून प्रवासी भाडे घेणे चुकीचे - सोनिया गांधी

विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भाडे घेण्यात आले नाही मग प्रवासी मजुरांसाठी अशी विनम्रता का दाखवली जाऊ शकत नाही? असा प्रश्नही सोनिया गांधी यांनी केला आहे. पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, गुजरातमधील एका कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून 100 कोटी रुपये ट्रान्सपोर्ट आणि खाण्यावर खर्च केले जाऊ शकतात, रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांच्या कोरोना फंडात 151 कोटी देऊ शकते तर मग प्रवासी मजुरांना रेल्वे प्रवास फुकट का करू दिला जात नाही? अशा संकटाच्या काळात मजुरांकडून रेल्वे भाडे घेणे चुकीचे आहे.

'प्रवासी मजुरांना तिकीट भाड्यासोबतच 500 रुपये देणार' नितीश कुमार

बिहार सरकारने प्रवासी मजुरांसाटी एक कौतुकास्पद निर्णयाची घोषणा केली आहे. सरकार सर्व प्रवासी मजुरांना तिकीटासोबतच 500 रुपये देणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी याबाबत घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...