आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Coronavirus News : Record Increase Of 21947 Patients In One Day, Now 6.27 Lakh Cases In The Country

कोरोना देश LIVE:एका दिवसात विक्रमी 21947 रुग्णांची वाढ, देशात आता 6.27 लाख केस, नवी मुंबई, पनवेलसह उल्हासनगरात आजपासून 10 दिवस लॉकडाउन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 18 हजार 225 मृत्यू झाले, महाराष्ट्रात सर्वात जास्त 8178 जणांचा मृत्यू
  • देशात गुरुवारी एका दिवसात 19999 रुग्ण झाले बरे, आता 2 लाख 28 हजार 975 अॅक्टिव्ह केस

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 6 लाख 27 हजार 168 झाली आहे. गुरुवारी एका दिवसात 21 हजार 947 नवीन रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा दिवसातील आजपर्यंतचा विक्रमी आकडा आहे. या व्यतिरिक्त 19 हजार 999 रुग्णही बरे झाले आहे. 

तर महाराष्ट्राच्या नवी मुंबई, पनवेल आणि उल्हासनगरमध्ये आजपासून 10 दिवस लॉकडाउन वाढवण्यात आलं आहे. तिन्हीही ठिकाणी कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे कोरोनाची व्हॅक्सीन तयार करण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानुसार, जायडस कॅडिला कंपनीला व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेजच्या क्लीनिकल ट्रायलची मंजूरी देण्यात आली आहे. हा निर्णंय एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीवर घेण्यात आला.

कोरोना अपडेट्स 

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आपले आकडे जाहीर केले. गेल्या 24 तासांत 20 हजार 903 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर 379 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढून 6 लाख 25 हजार 544 झाली आहे. त्यामध्ये 2 लाख 27 हजार 439 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच बरोबर 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे.

- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) शुक्रवारी म्हटले आहे की भारत बायोटेकने कोविड -19 औषध बनवले आहे. आयसीएमआरने आपल्या क्लिनिकल चाचण्यांसाठी 12 संस्था निवडल्या आहेत. आयसीएमआरनुसार, सरकार 15 ऑगस्ट रोजी याची सुरूवात करू शकते.

0