आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देश:संक्रमितांचा आकडा 5.27 लाखांवर; आज 18,292 नवीन रुग्णांची नोंद तर 399 मृत्यू

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 5 लाख 27 हजार 738 झाला आहे. शनिवारी देशात 18,292 नवीन रुग्ण सापडले, यात महाराष्ट्रात सर्वाधिक 6,338 रुग्ण सापडले. यासोबतच आज देशभरात 399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण मृतांचा आकडा 16,088 झाला. आज कोरोनामुक्त झालेल्या 13,011 रुग्णांसोबत देशातील एकूण ठीक झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 08 हजार 928 झाली आहे. तर, देशात सध्या 2 लाख 2 हजार 66 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. ही आकडेवारी https://www.covid19india.org/ वेबसाइटनुसार आहे.

दरम्यान, नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यापासू 1 हजार बेडचे रुग्णालय सुरू होणार आहे. हे हॉस्पीटल डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (डीआरडीओ) ने तयार केले आहे. यात लष्कराचे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचे कर्मचारी सेवा देतील.

शनिवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगितल्यानुसार, हे हॉस्पीटल धोला कुआंजवळ बनवले आहे. या हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन सप्लाय मशीन आणि व्हेंटिलेटर्ससोबत आयसीयू वार्डदेखील असेल.

डेक्सामेथासोनला सरकारची परवानगी

सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी डेक्सामेथासोन औषधाला वापरण्याची मंजूरी दिली आहे. सूज कमी करण्यासाठी या औषधाचा वापर होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सीजन सपोर्टची गरज असेल, त्यांना हे औषध दिले जाईल. डेक्सामेथासोनचा उपयोग मेथाइलप्रेडनिसलोनचा पर्याय म्हणून केला जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने डेक्सामेथासोनच्या प्रोडक्शनला वाढवण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश क्लीनिकल ट्रायलमध्ये हे औषध कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी असल्याचे समोर आले आहे.

अनलॉकमध्ये जास्त रुग्ण वाढले

अनलॉक-1 म्हणजेच जून महिन्याच्या 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. एक जूनला 1 लाख 98 हजार 371 रुग्ण होते. म्हणजे 26 दिवसांमध्ये 3 लाख 11 हजार 095 रुग्ण वाढले आहे. तर संक्रमितांचा आकडा पाच लाखांपेक्षा जास्त झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटही झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान रिकव्हरी रेटमध्ये 16 % वाढ झाली आहे.  आता रिकव्हरी रेट 58.26% वर गेला आहे.

लॉकडाउन आणि अनलॉक-1 ची तुलना केल्यास सर्वात जास्त 1 लाख 321 रुग्ण जूनमध्ये बरे झाले आहेत. म्हणजेच अॅक्टिव्ह आणि निरोगी रुग्णांमध्ये गॅप वाढला आहे. म्हणजेच एक जूनला जेव्हा अनलॉक-1 सुरू झाले होते. तेव्हा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 91 हजार 819 होती. तर रिकव्हरी केसची संख्या 87 हजार 692 होती. त्यावेळी दोन्हीमधील अंतर 4127 होते. तर 26 जूनला अॅक्टिव्ह केस 1 लाख 97 हजार 784 आणि रिकिव्हर केस 2 लाख 95 हजार 917 झाले आहे. दोघांमधील अंतर वाढून एक लाख 321 झाले आहे. 

6 दिवस, जेव्हा देशात सर्वात जास्त रुग्ण वाढले 

तारीखकेस
27 जून 18292
26 जून18256 
25 जून18185
24 जून 16753
23 जून15600
20 जून15918
बातम्या आणखी आहेत...