आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Coronavirus Outbreak Updates: 1.20 Lakh New Cases Detected In 24 Hours; News And Live Updates

कोरोना देशात:24 तासांत आढळले 1.20 लाख नवे रुग्ण, 1.97 बरे झाले तर 3,370 मृत्यू, 5 राज्यात संक्रमितांचा आकडा 66 टक्क्यांवर

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • यापूर्वी 6 एप्रिल रोजी 1.15 लाख कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते.

देशात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 20 हजार 332 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. तर एका दिवसात 1 लाख 97 हजार 371 रुग्ण बरे झाले असून यामध्ये 3 हजार 370 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 80 हजार 490 ने कमी झाला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात मोठी घट पाहायला मिळत आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या 59 दिवसात गुरुवारीची आकडेवारी ही सर्वात कमी असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 5 दिवसांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणात 1.50 लाखांपेक्षा कमी येत आहे. यापूर्वी 6 एप्रिल रोजी 1.15 लाख कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते.

देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत तर दुसरीकडे 5 राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांत संक्रमितांचा आकडा 66% टक्क्यांवर आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन केस : 1.20 लाख
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 1.97 लाख
 • 24 तासात एकूण मृत्यू : 3,370
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 2.86 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.67 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.44 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 15.51 लाख
बातम्या आणखी आहेत...