आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Coronavirus Vaccination Drive; Narendra Modi Govt Says December135 Crore Vaccine Doses; News And Live Updates

लसीकरणावर सरकारचे स्पष्टीकरण:डिसेंबर 2021 पर्यंत प्रत्येकांना लस मिळणार नाही, लसीसाठी कोणतीही मुदत नाही - केंद्र सरकार; डिसेंबरपर्यंत केवळ 135 कोटी डोस उपलब्ध होणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोणाला किती डोस देण्यात आले?

देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरणाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला काही प्रश्न केले होते. प्रत्युत्तरात केंद्र सरकारने या प्रश्नांचे लेखी उत्तर दिले आहे. यावरुन देशात लसीची कमतरता किती मोठी आहे हेदेखील उघड झाले आहे.

कारण सरकारने ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत 135 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले होते. परंतु, मे महिन्यांत ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत 215 कोटी डोस मिळतील असे म्हटले होते. त्यामुळे देशात लसींची किती मोठी कमतरता भासणार आहे हे लक्षात येईल.

लोकसभेत सरकारची कबुली
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीकरण अभियान पुर्ण करण्याची निश्चित मुदत सांगता येणार नसल्याचे लोकसभेत म्हटले आहे. त्यासोबतच डिसेंबर 2021 पर्यंत 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने लसीकरणावरुन केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारला लसींच्या उपलब्धतेबाबत विचार करायला पाहिजे.

देशात 42 कोटी लोकांचे लसीकरण
देशातील लसीकरणाचा आकडा 42 कोटींवर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 42.34 कोटी लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 54.76 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाची सुरुवात झाली आहे.

कोणाला किती डोस देण्यात आले?

आरोग्य कर्मचारी

 • पहिला डोस: 1.02 कोटी
 • दुसरा डोस: 76.51 लाख

फ्रंटलाइन वर्कर्स

 • प्रथम डोस: 1.78 कोटी
 • दुसरा डोस: 1.06 कोटी

18-44 वर्षांतील लोक

 • पहिला डोस: 13.33 कोटी
 • दुसरा डोस: 55.55 लाख

45-59 वर्षांतील लोक

 • पहिला डोस: 9.95 कोटी
 • दुसरा डोस: 3.25 कोटी

60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक

 • पहिला डोस: 7.29 कोटी
 • दुसरा डोस: 3.30 कोटी

एकूण: 42.34 कोटी

बातम्या आणखी आहेत...