आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Coronavirus Vaccine Shortage; Narendra Modi | Government Resume Exports Of Covid 19 Vaccines; News And Live Updates

भारतातील बिघडत्या परिस्थितीचा जगावर परिणाम:कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अनेक देशांचा लस पुरवठा थांबवला; ऑक्टोबरपर्यंत निर्यात पुन्हा सुरु होण्याची शक्यता नाही

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे भारताने निर्यात थांबवली

देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे, लसीची कमतरता आणि तिसर्‍या लाटेची शक्यता यामुळे भारताची अडचण वाढली आहे. परंतु, यामुळे अनेक देश चिंतेत असून जगावरही भारतातील बिघडत्या परिस्थितीचा परिणाम होणार आहे. कारण भारताकडून आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना आणि इतरही देशांना लसीचा पुरवठा केला जायचा. मात्र, तो आता बंद करावा लागणार आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, लसीकरणाची मोहिमदेखील सुरु आहे. पण लसींच्या पुरवठ्याअभावी अनेक राज्यांत 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. त्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हा फोटो यूपीच्या प्रयागराजचा आहे. तेज बहादूर सप्रू रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी येथे लोकांची लांबलचक रांग लागली आहे.
हा फोटो यूपीच्या प्रयागराजचा आहे. तेज बहादूर सप्रू रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी येथे लोकांची लांबलचक रांग लागली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, भारत ऑक्टोबरपर्यंत इतर देशांना मोठ्या प्रमाणात लसींची निर्यात करु शकत नाही. कारण देशात लसींची कमतरता भासत आहे. त्यामुळे सरकारचे भर आधी आपल्या गरजा पूर्ण करण्यावर असेल. या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या 'कोव्हॅक्स' उपक्रमांसह गरीब देशांना यांचा फटका बसणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे भारताने निर्यात थांबवली
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे केंद्र सरकारने एका महिन्यापूर्वीच लसीची निर्यात थांबवली होती. यापूर्वी भारताने जगातील अनेक देशांना 6.6 कोटी डोस मदत स्वरुपात आणि विकत दिले आहे. परंतु, आता बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला दुसरा पर्याय शोधावा लागत आहे.

भारताने मार्च महिन्यामध्ये पश्चिम आफ्रिकेत लसीचा पुरवठा केला होता.
भारताने मार्च महिन्यामध्ये पश्चिम आफ्रिकेत लसीचा पुरवठा केला होता.

दुसरी लाट आटोक्यात आल्यावर निर्यात सुरु होणार
देशात जोपर्यंत दुसरी लाट आटोक्यात येत नाही, तोपर्यंत निर्यात सुरु होणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. कारण कोरोनामुळे भारत देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा प्रभाव पडला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, लस निर्यातीवर देखरेख करणार्‍या परराष्ट्र मंत्रालयाला यासंबंधी विचारले असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

देशी लसीचे डोस भारतातून नामिबियात पाठविण्यात आले होते.
देशी लसीचे डोस भारतातून नामिबियात पाठविण्यात आले होते.

'कोव्हॅक्स'चे सीरमकडून 14 कोटी डोस अडकले
जागतिक आरोग्य संघटनेच्या 'कोव्हॅक्स' उपक्रमाला सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाकडून 14 कोटी डोस मिळणार होते. परंतु, त्याचा आता भारतातच वापर करण्यात येणार आहे. कारण देशातील लसींचा तुटवडा पाहता ते थांबवण्यात आल्याचे सीरमने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...