आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या नव्या स्ट्रेनला भारतीय सांगण्यावर सरकारने आक्षेप नोंदवला आहे. सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले की, B.1.617 व्हेंरिएंटला जगासाठी चिंताजनक सांगणाऱ्या जागतिक आरोग्य संघटने (WHO)च्या वक्तव्याला अनेक मीडिया रिपोर्ट्समधून दाखवण्यात आले. यातील काही रिपोर्टमध्ये या व्हेरिएंटला भारतीय सांगण्यात आले, पण असे नाहीये. सरकारचा दावा आहे की, WHO ने आपल्या 32 पेजच्या डॉक्यूमेंट्समध्ये B.1.617 व्हेरिएंटसोबत भारताचे नाव जोडले नाही.
WHO ने देखील जारी केले स्पष्टीकरण
जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा यावर स्पष्टीकरण जारी केले आहे. सोशल मीडिया पोस्ट करताना डब्लूएचओने लिहिले, की जागतिक आरोग्य संघटना व्हायरसच्या कुठल्याही व्हॅरिएंटला देशांची नावे देत नाही. आम्ही त्यांना फक्त शास्त्रीय नावे देतो. ते कुठे पहिल्यांदा सापडले यावरून त्या देशाचे नाव दिले जात नाही.
WHO ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात पसरत असलेल्या B-1617 स्ट्रेनला सोमवारी जागतिकरित्या चिंताजनक (व्हेरिएंट ऑफ कंसर्न) म्हटले होते. त्यांचे म्हणणे होते की, हा व्हेरिएंट ज्यास्त संक्रमक दिसत असून, हा वेगाने पसरतोय. कोरोनावर WHO च्या प्रमुख मारिया वेन केरखोव यांनी सांगितल्यानुसार, एका लहान सँपल साइजवर केलेल्या लॅब स्टडीमध्ये समोर आले आहे की, व्हेरिएंटवर अॅटीबॉडीजचा परिणाम कमी होत आहे. पण, याचा असा अर्थ नाही की, व्हेरिएंटमध्ये व्हॅक्सीनविरोधात प्रतिकारशक्ती जास्त आहे.
महाराष्ट्र, दिल्लीमध्ये संक्रमण वाढण्याचे हे कारण
B.1.617 व्हेरिएंट, ज्याला डबल म्यूटेंट स्ट्रेनदेखील म्हटले जात आहे, हा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याच व्हेरिएंटमुळे महामारीची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा व्हेरिएंट आढळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.