आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India COVID 19| UK And Many Countries Offer Help To India In Fight Against Surge In COVID 19

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशातून मदतीचा हात:ब्रिटन, फ्रांस आणि जर्मनीसह इतर देश भारताच्या मदतीला; म्हणाले- भारत आमचा मित्र देश, अशा कठीण प्रसंगी आम्ही सोबत आहोत

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापुरच्या चांगी विमानतळावरुन वायुसेनेचे C-17 विमान ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना - Divya Marathi
सिंगापुरच्या चांगी विमानतळावरुन वायुसेनेचे C-17 विमान ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना
  • EU आणि इराणनेही मदतीचा विश्वास दिला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला मित्र देशांकडून मदतीचा हात मिळाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी सायंकाळी म्हटले की, भारत आमचा मित्र देश आहे. अशा कठीण प्रसंगी आम्ही सोबत आहोत. आम्ही भारताच्या सतत संपर्कात आहोत.

जॉनसन यांच्या वक्तव्याच्या काही वेळानंतर ब्रिटन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही म्हटले की, भारताला तात्काळ 600 मेडिकल इक्विपमेंट्स पाठवले जात आहेत. यात ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स सामील आहेत. दुसरीकडे, दुबईने बुर्ज खलीफाला भारतीय तिरंग्यात रंगवून भारतासोबत असल्याचा संदेश दिला.

फ्रांस आणि जर्मनी मदतीला तयार

भारतात मेडिकल ऑक्सीजन कॅपेसिटी वाढवण्यासाठी फ्रांस आणि जर्मनीने तयारी केली आहे. जर्मन चांसलर एंजेला मर्केलने याला ‘मिशन सपोर्ट इंडिया’ नाव दिले आहे. त्यांनी म्हटले की- आपण सर्व महामारीचा सामना करत आहोत. आम्ही भारतासोबत आहोत. आम्ही यासाठी तयारी केली आहे. फ्रांसनेदेखील भारतासोबत असल्याचे म्हटले. यानंतर ऑस्ट्रेलियानेही लागेल ती मदत पुरवण्याचा विश्वास दिला.

सिंगापुरने मदत पाठवली

सिंगापुर सरकारने रविवारी एक शिपमेंट भारतासाठी रवाना केला. यात ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स आणि इतर मेडिकल इक्विपमेंट्स आहेत. हे सामान एअर इंडियाच्या एका स्पेशल फ्लाइटद्वारे भारतासाठी रवाना करण्यात आला.

यूरोपीय यूनियन मदतीसाठी तयार

यूरोपीय कमीशनच्या कमीशन उर्सला वॉन डेर लिनने रविवारी म्हटले- भारतात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्ही चिंतीत आहोत. अशा कठीण प्रसंगी यूरोपीय यूनियन भारताला मदत करण्यास तयार आहे. यूरोपीय यूनियनमध्ये सामील देशांमध्ये एक करार आहे. या अंतर्गत कठीण काळात ते यूरोपीय यूनियनमध्ये सामील देशांना मदत करू शकतात आणि याचा निर्णय कमीशनचा अध्यक्ष घेत असतो.

इराणने म्हटले- तांत्रिक मदत देण्यास तयार

इराणचे आरोग्य मंत्री सईद नामाकी यांनी भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी म्हटले की, इराण भारताला तांत्रिक मदत पुरवण्यास तयार आहे.

बातम्या आणखी आहेत...