आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Covid Vaccination Drive Update, Tika Utsav News; 69 Lakh People Vaccinated On First Day

व्हॅक्सीनेशनचा रेकॉर्ड:आज 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, 15 लाख डोससह मध्यप्रदेश टॉपवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचे लसीकरण

आज लसीकरणाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सोमवारी 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे ल सीकरण झाले आहे. राज्यांकडून सर्व डेटा आल्यानंतर हा आकडा अजून वाढू शकतो. cowin.gov.in वर दिलेल्या डेटानुसार, आतापर्यंत 80.96 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यापूर्वी, 5 एप्रिलला देशात 43 लाख नागरिकांचे लसीकरण झाले होते.

आजच्या लसीकरणाच्या आकडेवारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहीले, 'आजचे रेकॉर्डब्रेक लसीकरण आनंद देणारे आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी लस हेच शस्त्र आहे. लस घेतलेल्या सर्वांना मी अभिनंदन करतो. वेल डन इंडिया.'

मध्यप्रदेशात सर्वाधिक लसीकरण cowin.gov.in नुसार, सोमवारी सर्वाधिक लसीकरण मध्यप्रदेशात झाले. राज्यात 15.43 लाख नागरिकांनी लस घेतली. हा सर्वाधिक आकडा आहे. याशिवाय, कर्नाटक 10.67 लाख आणि यूपीत 6.74 लाख नागरिकांनी लस घेतली. दिल्लीत हा आखडा फक्त 76,216 आहे.

आतापर्यंत 28 कोटी लसीकरण दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 28.33 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. यात 23.27 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला तर 5.05 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...