आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Covid Vaccination Record; WHO Scientist Soumya Swaminathan Congratulates Over 1 Crore Vaccine Doses; News And Live Updates

लसीकरणाचे नवीन लक्ष्य:अ‍ॅडव्हायजरी गृप म्हणाले - एका दिवसात 1 कोटी लोकांचे लसीकरण झाले, लवकरच 1.25 कोटी करणार; WHO नेही भारताचे केले अभिनंदन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

देशात आज लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. शुक्रवारी देशात एक कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी यासाठी भारताचे अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे, हा देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी म्हटले आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची मोहीम सुरु आहे. भारत लवकरच एका दिवसात 1.25 कोटी लोकांचे लसीकरण करेल असा विश्वास अरोरा यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी देशाला 31 डिसेंबरपर्यंत दररोज 1 कोटी डोस द्यावे लागतील असेही ते यावेळी म्हणाले.

त्रिपुराची राजधानी अगरतळा येथील लसीकरण केंद्रात शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकांशी संवाद साधताना.
त्रिपुराची राजधानी अगरतळा येथील लसीकरण केंद्रात शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकांशी संवाद साधताना.

डॉ. स्वामीनाथन यांनी ट्विट करत दिली माहिती
भारत देशाने प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना लस (किमान एक डोस) दिली आहे. आतापर्यंत देशात एकूण 62 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये काल झालेल्या 1 कोटी डोसचा समावेश असल्याचे डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या एक हजाराहून अधिक लोकांचे अभिनंदन केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि लसीद्वारे कोरोनापासून बचाव करण्याच्या पद्धतींचा अवलंब करून आपण सर्व सुरक्षित राहू असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी नवी मुंबईतील वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात लोक लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत होते.
शुक्रवारी नवी मुंबईतील वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात लोक लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत होते.

हे एक मोठे यश - पंतप्रधान
देशात काल लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पार झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. हा देशासाठी एक मोठे यश असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी केलेल्या एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, आज लसीकरणाचा एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. 1 कोटीचा आकडा पार करणे ही मोठी उपलब्धी आहे. देशात ज्या लोकांनी लस घेतली आहे किंवा ज्यांनी लसीकरण मोहीम यशस्वी केली त्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...