आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Denies Permission To Test Russian Vaccine, Should First Be Tested On Small Scale: Indian Regulator

कोरोना लस:रशियन लसीच्या चाचणीला भारताने परवानगी नाकारली, आधी लहान स्तरावर चाचणी करावी : भारतीय नियंत्रक

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या अौषध नियंत्रकांनी स्पुटनिक-व्ही या रशियन कोरोना लसीच्या देशात व्यापक चाचणीच्या परवानगीस नकार दिला आहे. आधी लहान स्तरावर चाचणी करावी, असे भारतातर्फे सांगण्यात आले.

रशियाच्या कंपनीची भारतातील चाचणी आणि वितरणासाठीची भागीदार असलेल्या डाॅ. रेड्डीज लॅबने चाचणीसाठी अर्ज दिला होता. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या तज्ञांच्या पॅनलनुसार, इतर देशांत केलेल्या प्राथमिक स्तरावरील अभ्यासांचा सुरक्षितता आणि प्रतिबंधाबाबतचा डेटा खूप कमी आहे आणि त्यात भारतीय भागीदारांचे कुठलेही इनपुट नाही. भारताच्या या पावलामुळे रशियाची लस सर्व प्रकारच्या चाचण्या केल्याशिवाय बाजारात आणण्याच्या योजनेला धक्का बसला आहे. जेथे कोविड-१९ च्या नव्या घटनांची संख्या जास्त आहे अशा भारतासारख्या देशात लसीसाठी परवानगी मिळावी, अशी रशियाची इच्छा आहे. स्पुटनिक-व्ही लसीचे विपणन करणारा रशियाचा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि भारताच्या डाॅ. रेड्डीज लॅबने गेल्या महिन्यात भारतात या लसीच्या क्लिनिकल ट्रायल आणि वितरणाबाबत करार करण्याची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...