आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाद्वारे नोकऱ्यांना बूस्टर डोस देऊन आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवतील, अशी तरुणांची अपेक्षा होती. तरुणांसह अवघ्या देशाची हीच अपेक्षा होती.
पण गतवेळसारखेच अर्थमंत्र्यांनी संपूर्ण अर्थसंकल्पात रोजगार किंवा जॉब्स या शब्दाचा वापर केवळ 4 वेळा केला.
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात पीएम कौशल्य विकास योजनेचेच 4.0 व्हर्जन लाँच करण्याची घोषणा केली. तसेच तरुणांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोकऱ्यांसाठी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांत 30 स्किल इंडिया सेंटर्स उघडण्याचीही घोषणा केली.
आता पाहूया तरुणांच्या रोजगाराशी संबंधित योजना...
या घोषणांसह ट्राइब्सनाही रोजगार देण्याचीही चर्चा आहे. त्यात 740 एकलव्य शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
तथापि, 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) व आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतील नोकऱ्यांच्या वितरणावर कोणतीही चर्चा केली नाही.
बजेटमधील त्या घोषणा, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे रोजगार वाढीची शक्यता
तथापि, 2023 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह अर्थात PLI व आत्मनिर्भर भारत रोजगार योजनांमधील नोकऱ्यांच्या वितरणावर कोणतीही चर्चा केली नाही.
तर, सारासार विचार केला असता अर्थसंकल्पात नोकऱ्यांविषयी केवळ 3 घोषणा झाल्या. बजेटनंतर तुमच्या गरजेच्या अनेक गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या. पण 5 वर्षांपूर्वी GST लागू झाला होता. त्यानंतर बगजेटमध्ये काय स्वस्त किंवा महाग झाले हे समजणे अवघड झाले आहे. कारण, येथे डायरेक्ट टॅक्सची कोणतीही चर्चा होत नाही. अप्रत्यत्य करात थोडे वर-खाली होते. त्याच्या आधारावर स्वस्त-महागचा हिशोब केला जातो. त्याचा परिणाम येथे वाचू शकता...
अप्रत्यक्ष कराच्या प्रभावामुळे स्वस्त किंवा महाग कसे होते हे तुम्ही वाचले... आता तुमच्या उत्पन्नावर सरकारने किती कर लावला हे ही समजून घ्या... प्राप्तिकर स्लॅब 6 वरून 5 करण्यात आला आहे. आता 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. कराचे गणित समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
अर्थमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प 1 तास 27 मिनिटांपर्यंत सादर केला. खूपच लांबलचक. या बजेटमधील 23 ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आता पाहूया 2022 च्या अर्थसंकल्पात रोजगाराशी संबंधित कोणत्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचे आता काय झाले...
5 वर्षांत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा
आतापर्यंत काय झाले
आत्मनिर्भर भारत योजनेत 16 लाख नोकऱ्या
आतापर्यंत काय झाले
डिसेंबरमध्ये 16 महिन्यांच्या पीकवर पोहोचल्यानंतर जानेवारीत घसरला बेरोजगारीचा दर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) माहितीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 8.3% होता. गेल्या 16 महिन्यांतील हा उच्चांक होता. यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 8.3% होता. जानेवारीमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, त्यात 7.14% पर्यंत घट झाली.
CMIEचे MD महेश व्यास यांच्या मते, अलीकडच्या काही महिन्यांत रोजगारात सातत्याने वाढ होत असल्यामुळे डिसेंबर 2022 पर्यंत रोजगार 41 कोटींवर पोहोण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीपूर्वीची म्हणजेच जानेवारी 2020 नंतरची ही सर्वोच्च रोजगार पातळी आहे.
EPFO मध्ये नवीन नोंदणी 16.5% नी वाढली आहे
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेरोल डेटानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 16.2 लाख नवीन सदस्य जोडले गेले. हे मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत 16.5% जास्त आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, गेल्या 9 वर्षांत ईपीएफओचे सदस्य दुप्पट म्हणजे 27 कोटी झाले आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1.22 कोटी नवे एनरोलमेंट झाले होते. आर्थिक वर्ष 2022-23 चे 8 महिने म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 1.05 कोटी एनरोलमेंट झाले. त्यानंतरचा डेटा सध्या उपलब्ध नाही. तुम्हाला खाली दिलेल्या ग्राफिक्सद्वारे हे समजेल...
2022मध्ये 67 स्टार्टअपमधील 25 हजार रोजगार कपात
Layoff.fyiच्या वृत्तानुसार, 67 स्टार्टअप्सनी 25 हजार जणांना नोकरीवरून काढले. BYJU'S, CARS24, ओला, OYO, Meesho, उडान, अनएकेडमी, स्विगी, शेयरचॅट व vedantu सारख्या मोठ्या स्टार्टअप्सनी रोजगार कपात केली. Layoff.fyiच्याच वृत्तानुसार, जानेवारी 2023मध्ये जगातील जवळपास 101 स्टार्टअप्सनी तब्बल 31,436 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.
2023 मध्ये टॉप-8 जॉब सेक्टर्समध्ये जॉब वाढण्याची आशा
लिंक्डइन इंडियाच्या एका अहवालात 2023 मध्ये 25 क्षेत्र सर्वाधिक रोजगार देतील असा दावा करण्यात आला आहे. LinkedInने जानेवारी 2018 ते जुलै 2022 दरम्यान केलेल्या संशोधनावर आधारित काही निष्कर्ष काढले. त्यावरून 2023 मध्ये कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्यांना जास्त मागणी आहे हे दिसून येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.