आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आजपासून भारत- इंग्लंड कसाेटी मालिकेला सुरुवात; प्रक्षेपण दु. 3.30 वाजेपासून

मुंबई / चंद्रेश नारायणन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि यजमान इंग्लंड क्रिकेट संघांतील सलामीच्या कसाेटी सामन्याला आज बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. दाेन्ही संघ सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडलेले आहेत. जायबंदी खेळाडूमुळे भारतीय संघाची डाेकेदुखी वाढली. टीमचा सलामीवीर मयंक अग्रवाल दुखापतीमुळे सलामीच्या कसाेटीत खेळू शकणार नाही. तसेच पृथ्वी शाॅ आणि सूर्यकुमार यादव हे सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाले. मात्र, ते निवडीदरम्यान उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे राेहित शर्मासाेबत सलामीचा पेच टीमसमाेर आहे. लाेकेश राहुल व ईश्वरन अभिमन्यूचा पर्याय आहे. यातील अभिमन्यू करिअरमधील पदार्पणाची कसाेटी खेळणार आहे. स्टाेक्सच्या अनुपस्थितीमध्ये इंग्लंडला आव्हानाला सामाेरे जावे लागेल.

१४ वर्षांनंतर कसाेटी मालिका विजयाचा टीम इंडियाचा मानस
भारतीय क्रिकेट संघाने २००७ मध्ये इंग्लंडच्या मैदानावर शेवटची कसाेटी मालिका जिंकली हाेती. याशिवाय भारतीय संघ १९७१ आणि १९८६ मध्येही मालिका विजयाचा मानकरी ठरला हाेता. २००७ नंतर भारताने तीन वेळा इंग्लंडचा दाैरा केला. यादरम्यान १४ कसाेटी सामने झाले. यात भारताने २ व इंग्लंडने ११ कसाेटी सामन्यांत विजय संपादन केला. त्यामुळे आता १४ वर्षांनंतर मालिका विजयासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

चॅम्पियनशिपची पहिली मालिका
आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यंदाच्या सत्राला भारत व इंग्लंड कसाेटी मालिकेतून सुरुवात हाेईल. मालिका विजयासह चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गुणांची कमाईचा संघांचा प्रयत्न असेल.

ट्रेंट ब्रिजवर कामगिरी बराेबरीत
आतापर्यंत ट्रेंट ब्रिजवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सात कसाेटी सामने झाले. यात प्रत्येकी २ कसाेटी विजयासह दाेन्ही संघांनी कामगिरीत बराेबरी साधली. यातील तीन कसाेटी सामने अनिर्णीत राहिले हाेते.

बातम्या आणखी आहेत...