आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅक्सिन:कोविशील्डला मान्यता न दिल्याने भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी, ॲस्ट्राझेनेकाच्या याच लसीला ब्रिटनची आहे मान्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनने ‘काेविशील्ड’ला मान्यता न दिल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, ब्रिटनने ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या (एझेडडी १२२२) लसीला मान्यता दिलेली आहे. मात्र भारतात ‘कोविशील्ड’ नावाने तयार होत असलेल्या याच लसीला मान्यता दिलेली नाही. हे भेदभावपूर्ण आहे.

श्रृंगला म्हणाले, ‘ब्रिटनचा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना या धोरणाचा फटका बसत आहे. परराष्ट्र मंत्र्यानी आपल्या ब्रिटिश समपदस्थांसोबत हा मुद्दा उपस्थित केला आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र त्यांनी पाऊल उचलले नाही तर आम्ही आमच्या अधिकार क्षेत्रानुसार प्रत्युत्तराची कार्यवाही करू.’

ब्रिटनने नव्या नियमांतर्गत ‘काेविशील्ड’चे दाेन्ही डाेस घेतलेल्या भारतीयांना व्हॅक्सिनेटेड म्हणून मान्यता दिलेली नाही. यामुळे ब्रिटनमध्ये गेल्यास त्यांना १० दिवसांपर्यंत विलगीकरणात राहावे लागेल. पुण्यातील सीरम कंपनी भारतात काेविशील्डची निर्मिती करत आहे.

बातम्या आणखी आहेत...