आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या नावावर नवा विक्रम:भारतात सर्वात कमी 85 दिवसात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली लस, अमेरिका आणि चीनलाही टाकले मागे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत.

भारताने व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत शनिवारी मोठा विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.

शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले की, केंद्र आणि रराज्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भारतातील डेथ रेट जगातील सर्वात कमी (1.28%) आहे.

सर्वात जास्त डोस वयस्करांना
आतापर्यंत भारतात 90 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि 55 लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये ही संख्या 99 लाख आणि 47 लाख आहे. 45 ते 60 वर्षांच्या वयाच्या 3 कोटी लोकांना पहिला आणि 6 लाखांपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3.95 कोटी लोकांना पहिला आणि 17.88 लाख जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. यामध्ये 45 पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर 2 एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. शनिवारी संपूर्ण देशात 1.45 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. महामारी सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

बातम्या आणखी आहेत...