आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात प्रथमच अंडरवॉटर ट्रेन धावली आहे. ही ट्रेन बुधवारी पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या पात्रातून कोलकात्याहून हावड्याला पोहोचली. मेट्रो रेल्वेचे जीएम पी उदय कुमार रेड्डी यांनी या ट्रेनमधून महाकरण ते हावडा मैदान असा प्रवास केला. ट्रेनने सकाळी 11.55 वाजता हुगळी नदी ओलांडली. हावडा येथे पोहोचल्यावर रेल्वेची पूजा करण्यात आली.
कोलकात्यामध्ये चाचणी करण्यात आलेली अंडरवॉटर मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या पूर्वेकडील एस्प्लॅनेड आणि पश्चिम किनाऱ्यावरील हावडा मैदान यांना जोडते. हावडा मेट्रो स्टेशन हे जमिनीत 33 मीटर खोलीवरील देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे.
हा अंडरवॉटर रेल्वे ट्रॅक 4.8 किमी लांबीचा असून हुगळी नदीखाली 520 मीटरचे दुहेरी बोगदे आहेत. हे मेट्रो बोगदे बनवण्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून यावर काम सुरू होते. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) सियालडेह आणि एस्प्लॅनेड दरम्यानचा 2.5 किमीचा ट्रॅक पूर्ण होण्याची वाट पाहत आहे, त्यानंतरच त्यावरून नियमित गाड्या सुरू केल्या जातील.
6 डब्यांची ट्रेन
कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) च्या अधिकार्यांनी माहिती दिली आहे की मेट्रो रेल्वेच्या सॉल्ट लेक डेपोपासून एस्प्लॅनेड आणि सियालडेह दरम्यानच्या ईस्ट बाँड बोगद्यामार्गे एस्प्लॅनेडपर्यंत 2 ट्रेन चाचणीसाठी धावतील, ज्यात सध्या 6 डबे असतील. रेड्डी म्हणाले की, पुढील काही महिन्यांपर्यंत ही चाचणी केली जाईल.
बॅटरीवरील इंजिन
सियालडेह ते एस्प्लॅनेड पर्यंतच्या गाड्या बॅटरी इंजिनवर चालवल्या जातील कारण ट्रॅकवर विद्युतीकरण केले गेले नाही. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) ने सांगितले की पुढील काही महिन्यांत ट्रेन नियमितपणे धावण्यास सुरुवात होईल. यासह भारतही अशा देशांच्या यादीत सामील होईल जिथे मेट्रो ट्रेन पाण्याखालून धावतात.
देशातील पहिली मेट्रो कोलकात्यातच धावली
देशातील पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये कोलकातामध्येच सुरू झाली होती. त्यानंतर 2002 साली दिल्लीत दुसरी मेट्रो धावली. आता अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे.
लंडन आणि पॅरिसच्या धर्तीवर मेट्रो धावणार आहे
लंडन-पॅरिसच्या धर्तीवर भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो ट्रेन धावणार आहे. या अंडरवॉटर मेट्रोची तुलना लंडनच्या युरोस्टारशी केली गेली आहे, जी लंडन आणि पॅरिसला अंडरवॉटर रेल्वे लिंकने जोडते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.