आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने मेडिकल डिप्लोमसीद्वारे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मेडिकल उपकरणांवर चीनवरील अवलंबित्व कमी करून त्याचा मोठा भाग जपानमधून आयात केल्याने कोट्यवधी डॉलरचा फटका चिनी कंपन्यांना बसणार आहे. भारताचे विश्वासू सहकारी राष्ट्र जपानच्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत चांगला जम बसवण्याची संधी मिळेल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे उपकरणांच्या बाबतीत सामान्य रुग्णांना लाभ मिळेल.
चिनी उपकरणे किफायतशीर असली तरीही जपानच्या उच्च दर्जाच्या उपकरणांपुढे ती टिकत नाहीत. कोरोनानंतर भारतात चिनी मेडिकल उपकरणांची आयात ५७ टक्क्यांनी वाढली आहे. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियानुसार मेडिकल उपकरणांच्या प्रमुख श्रेणींत २०२०-२१ मध्ये चीनमधून आयात ३२७ दशलक्ष डॉलर (२,६८१ कोटी रुपये) होती. ती वाढून ५१५ दशलक्ष डॉलरवर (४,२२३ कोटी रुपये) पोहोचली. जपानने भारताच्या गरजांची पूर्तता करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. जी-२० दरम्यान क्वाड देशांच्या द्विपक्षीय बैठकीत या मुद्द्यावर निर्णायक टप्प्यातील चर्चा झाली.
चीनमधून दरवर्षी ७ हजार ३८० कोटींच्या उपकरणांची आयात मेडिकल तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रगत उपकरणांसाठी भारत,अमेरिका, ब्रिटनसारखे प्रमुख देश चीन, जपान व सिंगापूरवर अवलंबून आहेत. जगात सर्वाधिक उपकरणे चीन पाठवते. त्यात सर्वात अत्याधुनिक उपकरणे जपान निर्यात करते. भारत सध्या जपानमधून दरवर्षी १३१ दशलक्ष डॉलरची (१०६६ कोटी रुपये) उपकरणे मागवतो. चीनमधून ९०० दशलक्ष डॉलरची (७,३८० कोटी रुपये) उपकरणे आयात केली जातात. ही आयात सातपट जास्त आहे. म्हणूनच पाच वर्षांत चीनमधून मेडिकल उपकरणांची आयात १३० दशलक्ष डॉलर (१०६६ कोटी रुपये) तर जपानमधून ९०० दशलक्ष डॉलरची (७३८० कोटी रुपये) करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. जपानसोबत द्विपक्षीय व्यापारासाठी सीमा शुल्क चीनच्या तुलनेत कमी आहे.
चीनसाठी व्यापार शस्त्रासारखा, आर्थिक प्रहार गरजेचा रायसीना डायलॉगदरम्यान चीनच्या विरोधात आवाज बुलंद झाला. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट म्हणाले, चीन व्यापाराला शस्त्रासारखे वापरत आहे. त्याच्यावर नियंत्रणासाठी आर्थिक प्रहार होणे गरजेचे आहे. या बैठकीनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी जपानसोबत पुरवठा साखळी बळकट करणाऱ्या मुद्द्यावर स्वतंत्र बैठक घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.