आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोविड सारख्या पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझामुळे झालेल्या मृत्यूची बातमी पहिल्यांदाच समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत H3N2 चे 90 रुग्ण आढळून आले आहेत.
दोन महिन्यांपासून इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह भारतातील अनेक भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती आहे, कारण कोरोना सारखीच लक्षणे त्रस्त रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागातून असे अनेक रुग्ण रुग्णालयात पोहोचले आहेत, ज्यांना गेल्या 10-12 दिवसांपासून तीव्र तापासह खोकला येत आहे.
एम्सचे माजी संचालक म्हणाले, ज्येष्ठांनी अधिक काळजी घेणे आवश्यक
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की हा कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा. वृद्ध आणि आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामुळे जास्त अडचणी येण्याची शक्यता आहे.
या संबंधित आणखी बातम्या वाचा...
एका आठवड्यात कोरोना प्रकरणांमध्ये 63% वाढ:केरळमध्ये सर्वाधिक; H3N2 विषाणू कारण ठरतेय का?
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता पुन्हा एकदा भीती वाटायला लागली आहे. 67 दिवसांनंतर, कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3 हजारांहून अधिक झाले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्याबरोबरच H3N2 विषाणूच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे, जी चिंताजनक आहे. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पाहा की, कोरोनाचे रुग्ण अचानक का वाढत आहेत? H3N2 व्हायरसशी त्याचा काही संबंध आहे का? पूर्ण बातमी वाचा...
H3N2 विषाणूचे रुग्ण वाढणार:मास्क घालण्याची सवय लावा, सॅनिटायझर न वापरल्यास थेट रुग्णालयात पोहोचाल
उत्तर भारतात H3N2 विषाणूची प्रकरणे नोंदवली जात आहेत. ICMR नुसार, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या विषयीचा डाटा पाहिला की लक्ष्यात येते की, 15 डिसेंबरपासून H3N2 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
ICMR ने असेही नोंदवले आहे की गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) ग्रस्त अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये H3N2 विषाणू आढळले आहेत. हा सर्व माहितीचा विषय झाला आहे. मुद्दा असा आहे की जर तुम्हीही गर्दीत होळी खेळली असेल, तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, तुम्ही आधीच अस्थमा आणि हृदयाचे रुग्ण आहात, तर कामाची गोष्टमध्ये जाणून घ्या की, तुम्हाला H3N2 विषाणूचा धोका आहे. आणि ते कसे टाळावे, त्यावर काय उपाय आहेत... पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.