आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Has Fallen In Gender Equality, It Will Take 135 Years To Achieve Equality In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:महिला-पुरुष समानतेत भारताची झाली घसरण, जगभरात समानता नांदण्यासाठी लागतील 135 वर्षे, वर्षभरात वाढली 36 वर्षांची दरी!

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स’ जाहीर, महामारीदरम्यान जग एक पिढी मागे पडले

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने महिला-पुरुष समानतेबाबत १५६ देशांतील पाहणी अहवाल जारी केला. त्यात भारताची २८ क्रमांकांनी घसरण झाली. भारत आता १४० व्या स्थानी आहे. काेरोना महामारीमुळे जगभरात असमानता वाढीस लागली. त्यामुळेच आता जगभरात महिला-पुरुष समानता येण्यासाठी सुमारे १३५.६ वर्षे लागू शकतील. गेल्या वर्षी ही अपेक्षा ९९.५ वर्षे एवढी होती. म्हणजेच त्यात सुमारे ३६ वर्षे वाढली. त्याबद्दल फोरमने चिंता व्यक्त केली. महामारीने समानतेच्या बाबतीत असलेले अंतर एक पिढी एवढे वाढवले आहे.

सर्वात कमी भेदभाव आइसलँडमध्ये, सलग १२ व्यांदा जगात अव्वल
महिला-पुरुष समानतेत आइसलँड सलग १२ व्यांदा जगात अव्वल राहिले आहे. येथे समानतेची पातळी सुमारे ९० टक्के म्हणजेच सर्वात कमी भेदभाव. एवढेच नव्हे तर नामिबिया, रवांडा व लिथुआनियासारखे देशही आघाडीच्या दहा देशांत समाविष्ट आहेत.

सर्वात मोठा फरक राजकारणात, आर्थिक समानतेत दुप्पट वेळ लागेल
सर्वात मोठी असमानता राजकारणात आहे. या क्षेत्रात महिलांची भागीदारी केवळ २२ टक्के आहे. आरोग्य क्षेत्रात मात्र सर्वाधिक समानता दिसते. महिलांच्या भागीदारीचे प्रमाण ९६ टक्के आहे. आर्थिक समानतेत महिलांचे प्रमाण सुमारे ५८ टक्के आहे. परंतु पुरुषांच्या बरोबरीसाठी त्यांना २६७.६ वर्षे लागतील.

पाहणीसाठी जेंडर गॅपचे ४ प्रमुख मापदंड
ही क्रमवारी ४ मापदंडांवर पाहिली जाते. आर्थिक भागीदारी, संधी, शैक्षणिक स्थिती, आरोग्य तसेच जगण्याची स्थिती आणि राजकीय बळकटीकरण. त्यात महिला-पुरुषांची प्रगती व फरक यांचा अभ्यास केला जातो.त्यावरुन या पाहणीचे निकष ठरवण्यात आले.

  • 37 जगभरातील देशांनी शिक्षणात महिला-पुरुष समानतेची पातळी गाठली आहे.
  • 26.1% महिलांचा संसदेत सहभाग. १५६ देशांतील ३५,५०० सदस्यांत.
  • 22.6% महिला मंत्र्यांची भागीदारी एकूण ३४०० मंत्र्यांमध्ये.
बातम्या आणखी आहेत...