आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अलर्ट:भारतातील रुग्णवाढीचा वेग जगात सर्वाधिक, तो अमेरिकेपेक्षाही दुप्पट, देशात 19 दिवसांत रुग्ण दुप्पट

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात या महिन्यात रुग्ण 3.6% दराने वाढले, अमेरिकेत हे प्रमाण 1.8%

भारतात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचा सरासरी दर ३.६% झाला आहे. हा दर जगातील सर्वात जास्त आहे. म्हणजेच, भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सर्वाधिक ३९ लाख रुग्ण असलेल्या अमेरिकेत हे प्रमाण भारतापेक्षा निम्मे १.८% आहे. यामुळे भारतात रुग्ण दुप्पट होण्यासाठी केवळ १९ दिवस लागत आहेत. एक महिन्यापूर्वी २५ दिवस लागायचे. सध्या देशात ११ लाखांहून जास्त रुग्ण आहेत. यानुसार ८ ऑगस्टपर्यंत देशातील रुग्णसंख्या २२ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच हा वेग कमी न झाल्यास ऑगस्टच्या अखेरीस देशात एकूण ४४ लाख कोरोनाबाधित रुग्ण असू शकतात.

१ जुलै ते १९ जुलैदरम्यान भारतात एकूण ५.३७ लाख नवीन रुग्ण आढळले. इतकेच रुग्ण ३० जानेवारी ते ३० जून या चार महिन्यांत आढळले होते. देशात ८ जुलैपर्यंत एकदाही नवीन रुग्णांची संख्या २५ हजारांच्या वर गेली नव्हती. मात्र, आता दिवसाला ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...