आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Started The Second Phase Of Clinical Trials With A Capacity To Produce More Than 10 Vaccines In Ten Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:भारतात दहा महिन्यांत 10 काेटींहून जास्त लस उत्पादनाची क्षमता, दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू केले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला या क्षमतेच्या लसीचे उत्पादन घेतले जाऊ शकते

कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस तयार झाल्यानंतर ७.५ काेटी ते १० काेटी वायल्सची निर्मिती करण्याची क्षमता देशातील केवळ एका कंपनीत आहे. परंतु गरज भासल्यास लस उत्पादनात सात ते आठ कंपन्या सहभागी हाेऊ शकतात.

नीती आयाेगाचे सदस्य (आराेग्य) तथा लस प्रशासकीय समितीचे प्रमुख डाॅ. व्ही.के. पाॅल म्हणाले, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला या क्षमतेच्या लसीचे उत्पादन घेतले जाऊ शकते. भारतीय कंपनी भारत बायाेटेककडून तयार लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मंगळवारपासून कार्यकर्त्यांची नाेंदणी केली जात आहे. दुसरी भारतीय कंपनी जायटस कॅडियानेदेखील दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. काेविड-१९ मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत काही औषधांच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचीदेखील प्रतीक्षा करण्यात आलेली नाही. लसीमध्येदेखील अशी व्यवस्था असते. भारतात हा प्रश्न प्रासंगिक नाही.

लेबनाॅनचे अर्थमंत्री पाॅझिटिव्ह; क्वाॅरंटाइन ठेवले

बैरुत । लेबनाॅनचे अर्थमंत्री चार्बेल वेहबे पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना दाेन आठवड्यांसाठी क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यांच्या चाचण्यांबद्दलचा संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट हाेऊ शकला नाही. देशात २१ हजार ३२४ बाधित रुग्णांची संख्या आहे. ६ हजार ७२२ लाेक ठणठणीत हाेऊन घरी परतले आहेत.