आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Has The Highest Number Of 68,206 Cases In The World In The Last 24 Hours, With More Than 5 Lakh Active Patients After 138 Days.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 24 तासांमध्ये जगात सर्वात जास्त 68,206 प्रकरणे भारतात आढळले, 138 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 5 लाखांच्या पार

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 120 कोटी लोक संक्रमित

देशात कोरोनाची दुसरी लाट तीव्र होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जगात सर्वात जास्त रुग्ण भारतात आले आहेत. येथे रविवारी 68,206 संक्रमित आढळले. हे आकडे गेल्या 169 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. यापूर्वी मागच्या वर्षी 10 ऑक्टोबरला 74,418 प्रकरणे समोर आली होती. तर काल 32,149 लोक बरे झाले आणि 295 लोकांनी प्राण गमावले.

दुसरीकडे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सलग वाढत आहे. देशात 138 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पार पोहोचला आहे. सध्या येथे 5 लाख 18 हजार 767 लोकांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी 9 नोव्हेंबरला देशात 5 लाख 4 हजार 873 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले होते.

आतापर्यंत 120 कोटी लोक संक्रमित
देशात आतापर्यंत 1.20 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून जवळपास 1.13 कोटी बरे झाले आहेत. 1.61 लाख रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 5.18 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात रविवारी 40,414 नवीन रुग्ण आढळले. 17,874 बरे झाले तर 108 जणांचा मृत्यू झाला. हा एका दिवसात आढळलेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 26 मार्चला 36,902 प्रकरणे आढळले होते. राज्यात आतापर्यंत 27.13 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 23.32 लाख बरे झाले आहेत. तर 53,101 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या 3.25 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...