आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Is Chairing The UN Security Council This Year, Chairing The Prime Minister's Meeting For The First Time In 75 Years

यूएनएससी:संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे, 75 वर्षांत प्रथमच पंतप्रधान बैठकीच्या अध्यक्षस्थानी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा परिषदेच्या हंगामी सदस्यपदाची सातवी वेळ

येत्या १५ ऑगस्टला भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारताला जगातील सर्वात शक्तिशाली संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) अध्यक्षस्थान मिळाले आहे. भारताने १ ऑगस्ट रोजी फ्रान्सकडून ही जबाबदारी स्वीकारली. एक महिना या पदावर असताना भारताने बोलावलेल्या बैठकांपैकी एका बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदीही सांभाळतील. गेल्या ७५ वर्षांत प्रथमच एखादा भारतीय पंतप्रधान यूएनएससीच्या एखाद्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी दूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी फ्रान्सचे प्रतिनिधी निकोलस डी रिवेयर यांच्याकडून अध्यक्षाचा पदभार स्वीकारला. अध्यक्ष म्हणून २ ऑगस्ट हा भारताचा पहिला कार्य दिवस असेल. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, या महिन्यात भारताच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत.

सुरक्षा परिषदेच्या हंगामी सदस्यपदाची सातवी वेळ
सुरक्षा परिषदेच्या हंगामी सदस्यपदी निवड होण्याची भारताची सातवी वेळ आहे. यापूर्वी प्रथम १९५०-५१ मध्ये निवडला गेला हाेता. नंतर १९६७-६८, १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५ आणि १९९१-९२ मध्ये निवडला गेला. परिषदेत सध्या १५ सदस्य आहेत. यात पाच स्थायी सदस्य म्हणून अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन आहे. बाकी १० हंगामी सदस्यांची निवड दर दोन वर्षांनी एवढ्याच कार्यकाळासाठी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...