आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Is One Of The Safest Countries To Give A Single Dose Of Vaccine To 75% Of Adults!

लसीकरण:75 टक्के प्रौढांना लसीचा सिंगल डोस देत भारत सर्वाधिक सुरक्षित देशांत समाविष्ट! लस हेच कोरोनाचे मृत्यू राेखण्याचे सर्वात मोठे शस्त्र

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनसह ज्या देशांत 75% प्रौढांना कवच मिळाले, तेथे कोरोनामृत्यू घटले

कोरोनाला हरवण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरणाच्या २७७ दिवसांनंतर भारत १०० कोटी डोसचा टप्पा गाठत आहे. बुधवार रात्री वा गुरुवारी दुपारपर्यंत देशात १०० कोटी डोस पूर्ण झाले असतील. यात ७० कोटी लोकांना सिंगल डोस, तर ३० कोटी लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील. आधार डेटानुसार, देशात १८ वर्षांवरील ९४ कोटी लोक आहेत. या हिशेबाने आजवर ७५% प्रौढांना सिंगल, ३०.६% लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल आजवर जे काही संशोधन समोर आले आहे, त्यात एक बाब समान आहे. ती म्हणजे, लस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी मृत्यूची शक्यता ४ ते ५ पटींनी कमी असते.

उदाहरणार्थ - काही आठवड्यांपूर्वी ब्रिटनमध्ये रोज २२ हजार रुग्ण, तर १०० पेक्षा जास्त मृत्यू होत होते. लसीकरणापूर्वी २२ हजार रुग्णांमागे ५०० पेक्षा जास्त मृत्यू व्हायचे. हाच ट्रेंड जर्मनी, इटली, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन व आयर्लंडमध्ये दिसला. विशेष म्हणजे, या देशांतील ७५% प्रौढांना किमान एक डोस मिळाल्यानंतर मृत्यू घटण्याचा हा सिलसिला सुरू झाला. भारतही आता याच स्थितीत पोहोचला आहे. तज्ज्ञांनुसार, आगामी काळात भारताही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत घट होऊ शकते.

- ४० कोटी लाेकसंख्येच्या ३ राज्यांत वेग वाढल्यास राष्ट्रीय सरासरी सुधारू शकते

- राजस्थान-हरियाणासह या ५ राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग सामान्यापेक्षा चांगला

- सरासरी कायम राहिल्यास या राज्यांत यंदाच ९०% प्रौढांना दोन्ही डोस शक्य

कोव्हॅक्सिन, झायकोव्ह-डी लसींंवर आशा
- झायडस कॅडिलाच्या एकमेव झायकोव्ह-डी या लसीला आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे.
- २-१८ वर्षांच्या मुलांसाठी कोव्हॅक्सिनला विषय तज्ज्ञ समितीची मंजुरी मिळालेली आहे. आता डीजीसीआयकडून हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा.

बातम्या आणखी आहेत...