आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था:ब्रिटनची सहाव्या जागेवर घसरगुंडी, भारतीय अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत पुन्हा एकदा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ब्रिटनची सहाव्या क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे. जागतिक नाणेनिधीच्या (IMF) च्या माहितीनुसार, भारताने 2021 च्या शेवटच्या 3 महिन्यांत ब्रिटनला मागे टाकले. जीडीपी आकडेवारीच्या बाबतीतही भारताने 2022-23 या आर्थिक वर्षात आघाडी कायम ठेवली आहे. भारतीय अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलर्सची राहिली.

या कालावधीत ब्रिटनची अर्थव्यवस्था 816 अब्ज डॉलर्स राहिली. दैनंदिन वापराच्या वस्तू महाग झाल्यामुळे ब्रिटनची पाचव्या स्थानावरून घसरण झाली आहे. दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने विस्तार होत आहे. एका दशकापूर्वी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर होता. तर ब्रिटन 5 व्या क्रमांकावर होता.

ब्रिटन गत 4 दशकांपासून सर्वाधिक महागाई व मंदीच्या वाढत्या धोक्याचा सामना करत आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या अंदाजानुसार ही स्थिती 2024 पर्यंत कायम राहील. दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्था यंदा 7 टक्क्यांच्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता

ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता व सत्ताधारी पक्षात नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू असताना ही स्थिती उद्भवली आहे. आंतरराष्ट्रीय रँकिंगमधील या घसरणीमुळे ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांना लज्जास्पद स्थितीचा सामना करावा लागेल.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य सोमवारी बोरिस जॉन्सन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करतील. यात परराष्ट्र मंत्री लिज ट्रस व माजी चॅन्सलर ऋषी सुनक आघाडीवर आहेत.

ब्रिटनची यापूर्वीही झाली होती घसरगुंडी

IMF च्या माहितीनुसार, 2019 मध्येही नॉमिनल जीडीपीच्या प्रकरणात भारत 5 वी मोठी अर्थव्यवस्था (2.9 लाख कोटी डॉलर्स) बनला होता. त्यावेळीही ब्रिटन (2.8 लाख कोटी डॉलर्स) सहाव्या क्रमांकावर घसरला होता.

दरम्यान, MSME एमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्येही भारताने चीनला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

बातम्या आणखी आहेत...