आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Is The 8th Country In The World To Give The Highest Dose Of Corona Vaccine

लसीकरणाचे 7 दिवस:कोरोना कवच : कर्नाटक-आंध्र प्रदेश अव्वल, पंजाब-दिल्ली पिछाडीवर; सर्वाधिक डोस देणारा भारत जगातील 8वा देश

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोज दिल्या जाणाऱ्या डोसची संख्या पुढील आठवड्यापासून दुप्पट

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन शुक्रवारी ७ दिवस झाले. एकूण १ कोटीपैकी १२.९७ लाख हेल्थ वर्कर्सना पहिला डोस देण्यात आला आहे. म्हणजे १३% हेल्थ वर्कर्सना तो दिला. यापैकी केवळ १,११६ लोकांत काही साइड इफेक्ट दिसून आले. हे प्रमाण डोस घेतलेल्यांच्या तुलनेत केवळ ०.०९% आहे. विशेष म्हणजे दक्षिणेकडील राज्यांत लस घेणाऱ्यांची संख्या उत्तर भारतातील राज्यांपेक्षा अधिक आहे. कर्नाटकात सर्वाधिक १.८३ लाख आणि आंध्र प्रदेशात १.२७ लाख लोकांना डोस देण्यात आला, तर दिल्ली, पंजाब व झारखंडमध्ये हा वेग अत्यंत कमी आहे.

आतापर्यंत एकूण डोसचे प्रमाण पाहिले तर भारत सर्वाधिक लस देणाऱ्या देशांत आठवा ठरला आहे. एक आठवड्यापूर्वी लसीकरण सुरू करणारा भारत ३१ वा देश होता. भारतात रोज सरासरी २ लाखांहून कमी डोस दिले जात आहेत, परंतु पुढील आठवड्यात ही संख्या दुप्पट होईल. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सर्व हेल्थ वर्कर्सना लस दिली जाईल, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

दोन दिवसांनी भारत सहाव्या स्थानावर येऊ शकतो
जगात सर्वात अगोदर ब्रिटनमध्ये ८ डिसेंबरला लस देणे सुरू झाले. भारतात १६ डिसेंबरला प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, सोमवारी ही मोहीम वेग घेईल तेव्हा भारत सर्वाधिक डोस देणारा जगातील सहावा देश ठरू शकतो.

जगात... 5.66 कोटी लोकांना पहिला कोरोना डोस दिला, ३.३ कोटी अमेरिका, चीनमधील
मात्र लोकसंख्येच्या तुलनेत विचार करता इस्रायलमध्ये सर्वाधिक 38.04% लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

लस घेतल्यानंतर डॉक्टर घेणार सेल्फी
देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था आयएमए लस घेणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी १८०० शाखांमधील डॉक्टरांना प्रोत्साहन देत आहे. सरचिटणीस डॉ. जयेश लेले म्हणाले, लस घेताना डॉक्टर सेल्फी घेतील. लोकांचा विश्वास वाढावा यासाठी हे फोटो प्रसिद्ध केले जातील. ‘डोंट हेजिटेट, व्हॅक्सिनेट’ हा संदेश फलकही कार्यालयावर लावला जाईल.

डॉक्टरांनी लस घेतली तरच लोकांत विश्वास निर्माण होऊ शकेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, “डॉक्टरांनी लस घेतली तरच लोकांमध्ये ही लस सुरक्षित व परिणामकारक आहे, असा संदेश जाईल. देशभर लस घेतलेले लाखो आरोग्य कर्मचारी सुरक्षित आहे, याचा मला आनंद वाटतो.’

बातम्या आणखी आहेत...