आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Is The Capital Of Infiltrators, We Will Stop It: Center; Demand For Release Of Rohingyas, Decision Reserved In Supreme Court News And Updates

नवी दिल्ली:भारत घुसखोरांची राजधानी मुळीच नव्हे, आम्ही ते रोखणार : केंद्र; रोहिंग्यांच्या सुटकेची मागणी, सुप्रीम कोर्टात निकाल राखीव

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या नरंसहाराबाबत गेल्या वर्षी २३ जानेवारीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निर्णय दिला होता

रोहिंग्या मुस्लिमांसंबंधी खटल्याच्या सुनावणीदरम्यान शुक्रवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्राने नमूद केले. प्रकरण जम्मू-काश्मिरातील एका छावणीतील १५० रोहिंग्या मुस्लिमांशी संबंधित आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुढील सुनावणीपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे. याचिकाकर्ते मोहंमद सलिमुल्ला यांनी वकील प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

छावणीत राेहिंग्यांची तेथून तत्काळ सुटका केली जावी. मायदेशी म्यानमारला पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती याचिकेतून केली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या याचिकेवर सुनावणी केली. यादरम्यान केंद्राचे वकील तुषार मेहता यांनी छावणीतील रोहिंग्या स्थलांतरित नसून घुसखोर असल्याचे म्हटले.

कोर्टातील सुनावणी अशी :
सुनावणीत भूषण म्हणाले, म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या नरंसहाराबाबत गेल्या वर्षी २३ जानेवारीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निर्णय दिला होता. म्यानमारच्या सैन्याने निर्दोष लोकांची हत्या केली आहे. त्यात सुमारे ७.४४ लाख रोहिंग्या समुदायातील लोक बेघर झाले व त्यांनी शेजारच्या देशात पलायन केले. त्यावर ही याचिका भारतीय नागरिकांसाठी आहे. इतर देशांतील नागरिकांसाठी नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...