आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवारी सकाळी नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानने पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. भारतीय सेना देखील पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. शनिवारी देखील पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. भारताने देखील याला प्रत्युत्तर कारवाई केली होती.
6 महिन्यांत 2 हजार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) कारवाया थांबवत नाहीये. नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने भारतातील गावांना लक्ष करून बॉम्ब टाकत आहेत. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत 6 महिन्यांत पाकिस्तानने 2027 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. प्रत्येकवेळी भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या दरम्यान काश्मीरमध्ये 100 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
पाकिस्तान कोरोनाचा फायदा घेऊ पाहत आहे
मागील वर्षी पाकिस्तानने काश्मीरमध्ये सर्वाधित 3168 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराला कोरोना साथीच्या साथीचा फायदा घ्यायचा आहे. कोरोना संकटात दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे.
2020 मध्ये युद्धविराम उल्लंघन
जानेवरी-367
फेब्रुवारी-366
मार्च-411
एप्रिल-387
मे-382 जून-114
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.