आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • India Lockdown 4.0 News Today; India Coronavirus Lockdown 4 Guidelines Latest News Updates; What's Permitted, What's Not In Lockdown 4.0

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 4.0 च्या गाइडलाइन्स जारी:68 दिवसांचा लॉकडाउन; जाणून घ्या तुमच्या शहरात काय बंद आणि काय सुरू असेल...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एनडीएमएच्या निर्देशांपूर्वीच तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब आणि मिजोरमने 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे
 • लॉकडाउनच्या तिसऱ्या फेजमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील परिस्थिती पाहून वेगवेगळी सूट देण्यात येईल

भारतात जगातील सर्वात मोठा लॉकडाउन 14 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. सोमवार (दि.18) मे पासून लॉकडाउनची चौथी फेज सुरू होईल आणि 31 मे रोजी संपेल. रविवारी लॉकडाउनची तिसरी फेज संपण्याच्या सहा तासांपूर्वीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच एनडीएमएने केंद्र सरकार आणि राज्यांना लॉकडाउन जारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यानंतर गृह मंत्रालयाने नवीन गाइडलाइंस जारी केल्या आहेत. आज रात्री 9 वाजता कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गाबा राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे चर्चा करणार आहेत. तमिळनाडुू, महाराष्ट्र, पंजाब आणि मिजोरम एनडीएमएच्या निर्देशांपूर्वीच 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढण्यासोबतच सवाशे कोटी लोक 68 दिवसांपर्यंत निर्बंधांमध्ये राहील. जगातील इतर देशांच्या तुलनेत इतक्या मोठ्या लोकसंख्यला इतक्या दिवस लॉकडाउनमध्ये ठेवणारा भारत पहिला देश आहे.

नवीन गाइडलाइंस : 31 मे पर्यंत काय सुरू असेल?

 • दोन राज्य सामंज्यसाने वाहतुक सुरू करू शकतील.
 • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू होतील, पण दर्शकांना परवानगी नाही.
 • रेस्टोरेंट्स सुरू होतील, पण फक्त होम डिलिव्हरी सुरू राहील.
 • आरोग्य कर्मचारी, पोलिस, गव्हर्नमेंट ऑफिशिअल्स, आणि लॉकडाउनमुळे अडकलेले पर्यटक असलेले हॉटेल्स सुरू राहतील.
 • बस डेपोवर चालणारे कँटीन, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट्सवर असलेली खाण्या-पिण्याची दुकाने सुरू राहतील.

31 मे पर्यंत काय बंद असेल ?

 • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंद राहतील.
 • स्कूल, कॉलेज, एजुकेशन, ट्रेनिंग, कोचिंग इंस्टिट्यूटदेखील 31 मे पर्यंत बंद राहतील.
 • हॉटेल आणि बार बंद राहतील.
 • राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम बंद राहतील.

ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन राज्य ठरवतील

राज्य सरकार आता स्वतः ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन ठरवू शकतील. त्यांना फक्त केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवलेले पॅरामीटर पाहावे लागतील. तसेच, रेड आणि ऑरेंज झोनमधील कंटेनमेंट झोन आणि बफर झोन जिल्हा प्रशासन ठरवेल. याशिवाय कँटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच, या झोन्समधील लोकांचे येणे-जाणे न होण्यासाठी कडक पाउले उचलली जातील. यासोबतच कंटेनमेंट झोनमध्ये कॉन्टैक्ट ट्रेसिंग आणि घरो-घरी जाऊन सर्विलांस वाढवला जाईल.

रात्रीचा कर्फ्यू सुरू राहील

संध्याकाळी 7 पासून सकाळी 7 पर्यंत नागरिक कुठेही फिरू शकणार नाहीत. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडता येईल.

मुले आणि वृद्धांना घरातच राहावे लागेल

65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती, आधीपासूनच आजारी असलेले रुग्ण, ग‌र्भवती महिला आणि 10 पेक्षा लहान वयाच्या मुलांना घरातच राहावे लागेल. फक्त इमरजंसी परिस्थितीत त्यांना घराबाहेर पडता येईल.

आरोग्य सेतुचा वापर आणि अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरू

आफीसमध्ये आरोग्य सेतू अॅप वापरणे गरजेचे आसेल. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या फोनमध्ये हे अॅप असमे बंधनकार आहे. जिल्हा प्रशासनाने हे अॅप घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. या अॅपवर नागरिकांना आपले हेल्थ स्टेटस अपडेट करावे लागेल. यामुळे त्या लोकांपर्यंत तात्काळ मदत पोहचू शकेल. तसेच, सर्व राज्यांनी मेडिकल प्रोफेशनल्स जसे, डॉक्टर, नर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी आणि अँम्बुलेंसच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लावू नयेत. यासोबतच मालवाहू ट्रकलाही वाहतुकीची परवानगी देण्यात यावी.

कशे होते लॉकडाउनचे पहिले तीन फेज

देशात आतापर्यंत तीन फेजमध्ये 25 मार्च-14 एप्रिल, 15 एप्रिल-3 मे आणि 4 मे-17 मे पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला होता.

 • पहिली फेज: 25 मार्च-14 एप्रिलपर्यंत, हा 21 दिवसांचा होता. यादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानेच उघडण्याची परवानगी होती.
 • दुसरी फेज: 15-3 मे, हा 19 दिवसांचा होता. हॉटस्पॉट (रेड झन)व्यतिरिक्त ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली.
 • तिसरी फेज: 4 म-17 मे, हा 12 दिवसांचा होता. हॉटस्पॉट (रेड झोन)व्यतिरिक्त ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी होती. याशिवाय प्रवासी मजुरांठी ट्रेन आणि बससेवा सुरू करण्यात आली. वंदे भारत आणि समुद्र सेतू मिशनच्या माध्यमातून दुसऱ्या देशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशात आणण्यात आले.

कोणत्या शहरात निर्बंध कायम राहू शकतात ?

 • मध्य प्रदेश-(भोपाळ आणि इंदुर)
 • राजस्थान-(जयपूर, जोधपूर, उदयपूर)
 • महाराष्ट्र-(मुंबई, औरंगाबाद, पुणे, पालघर, सोलापूर, नाशिक आणि ठाणे)
 • उत्तर प्रदेश-(आग्रा आणि मेरठ)
 • दिल्ली- (दिल्ली)
 • पंजाब-(अमृतसर)
 • तमिळनाडू-(कुड्डालोर, चेंगलपट्टू, अरियालुर, विल्लुपुरम, तिरुवलूर आणि ग्रेटर चेन्नई)
 • गुजरात-(अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत)
 • तेलंगाणा- (ग्रेटर हैदराबाद)
 • ओडिशा-(बेरहमपूर)
 • बंगाल- (हावड़ा आणि कोलकाता)
 • आंध्र प्रदेश-(कुर्नूल)
बातम्या आणखी आहेत...