आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India lockdown janta curfew update details know what open and closed in delhi haryana maharashtra rajasthan chhattisgarh madhya pradesh jharkhand

21 दिवसांचा लॉकडाउन, पण घाबरू नका / राशन, भाजीपाला, दूध खरेदी-विक्री सुरू राहील; जाणून घ्या 14 एप्रिलपर्यंत काय सुरू आणि काय बंद असेल

delhi4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँक, इंश्योरेंस कार्यालय आणि एटीएम आणि राशन, किराना, फळ आणि भाज्या आणि डेरी सुरू

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 12 वाजेपासून पुढील 21 दिवसांसाठी संपूर्ण भारताक लॉकडाउनची घोषणा केली आहे.  म्हणजेच आज मध्यरात्रीपासून 14 एप्रिलपर्यंत देशताली 130 कोटी लोकांना आपल्या घरातच राहावे लागेल. अचानक केलेल्या या घोषणेमुळे नागरिकांमध्ये राशन आणि खाण्या-पीण्याच्या गोष्टींबद्दल चिंता आहे. या घोषणेनंतर देशातील अनेक भागात सामान घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिव्य मराठीची अपील आहे की, 21 दिवसांच्या या लॉकडाउनमुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण सरकारने मोदी यांच्या भाषणानंतर एक अॅडवायजरी जारी केली आहे. यात स्पष्टपणे सांगितले आहे की, राशन, भाजीपाला, दूध, पेट्रोल पंप, बँक मेिडकल स्टोरसारख्या महत्वाच्या सुविधा सुरू राहतील.

जाणून घ्या 14 एप्रिलपर्यंत काय सुरू राहणार आणि काय बंद.

हे बंद असेल : भारत सरकारची कार्यालये, ऑटोनॉमस आणि त्या संबंधी कार्यालय आणि नगरपालिका.


यांना सुट : डिफेंस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, ट्रेजरी, पेट्रोलियम, सीएनजी, एलपीजी, पीएनजी, आपत्ती व्यवस्थापन, पॉवर जनरेशन, ट्रांसमिशन यूनिट्स, डाकघर, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि पहिले वॉर्निंग देणाऱ्या एजन्सी.

हे बंद असेल : राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांची कार्यालय, ऑटोनॉमस डिपार्टमेंट आणि कॉर्पोरेशंस.


यांना सुट : पोलिस, होम गार्ड, सिविल डिफेंस, अग्नीशामन, आपातकालीन विभाग,आपत्ती व्यवस्थापन आणि तुरुंग. तसेच, जिल्हा प्रशासन आणि ट्रेजरी, विज, पाणी, सफाई विभाग.

हे सुरू असेल : हॉस्पीटल, प्रायवेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये मेडिकलशी संबंधित मॅन्यूफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्यूशनसह अनेक विभाग. डिस्पेंसरी, केमिस्ट, मेडिकल इक्विपमेंटची दुकाने, लॅबोरेटरीज, क्लिनिक, नर्सिंग होम, अँबुलेंससारख्या सेवा.

यांना सुट : मेडिकल स्टाफ, नर्स, पॅरा-मेडिकल स्टाफ आणि हॉस्पीटलशी संबंधित स्टाफ आणि त्यांचे ट्रांसपोर्टेशन.
दुकानं

यांना सुट : पीडीएस अंतर्ग येणारी राशन दुकाने, किराना दुकाने, फळ आणि भाज्यांची दुकाने, डेरी आणि मिल्क बूथ, मीट आणि मच्छी मार्केट, पशु चाऱ्यांची दुकानं

अॅडवायजरी : जिल्हा प्रशानाने या दुकानातून होम डिलीव्हरीला चालना देऊन, गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा.

या सेवा सुरू राहतील

1. बँक, इंश्योरेंस कार्यालय आणि एटीएम.
2. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया.
3. टेलीकॉम, इंटरनेट सेवा, ब्रॉडकास्टिंग, केबल सेवा. आयटी आणि आयटीशी संबंधित सेवा.
4. फूड, औषध, मेडिकल इक्विपमेंटसारख्या महत्वाच्या सुविधा.
5. पेट्रोल पंप, एलपीजीचे रिटेल आणि स्टोरेज आउटलेट. 
6. पॉवर जनरेेशन, ट्रांसमिशन आणि डिस्ट्रीब्यूशन यूिनट्स आणि सेवा.
7. कॅपिटल आणि डेट मार्केट सेवा, ज्यांना सेबीने नोटिफाय केलेले असेल.
8. कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाउस सेवा.
9. प्रायवेट सेक्योर
िटी सेवा.

0