आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळात गुड न्यूज:यंदा समाधानकारक पाऊस होणार, सरासरीच्या 98 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागाने यासंदर्भातील एक परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर केले आहे.

देशावरील कोरोना संकटाने आता रौद्ररुप धारण केले असल्याचे दिसत आहे. दरम्यान देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे. तर मॉन्सून सामान्य असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती ही गंभीर बनली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी केंद्रीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने यासंदर्भातील एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाने सांगितले आहे.

नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवण्यात येत असतो. यामध्ये एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसरा अंदाज वर्तवण्यात येतो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा कसा असणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...