आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाईच्या चटक्यांनी होरपळलेल्या सर्वसामान्यांसह चांगल्या पाऊसमानासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने (IMD) मंगळवारी यंदाच्या पाऊसमानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार, यंदा देशात सामान्य पाऊसमान होईल. विशेष म्हणजे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सोमवारीच यंदा देशात सामान्याहून कमी पाऊसमान होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. देशाच्या उत्तर व मध्य भागात यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले होते.
पाऊस सामान्य झाला तर त्याचा अर्थ देशातील अन्नधान्याचे उत्पादनही नॉर्मल राहण्याचा अंदाज आहे. यामुळे महागाईपासूनही सुटका होऊ शकते. देशातील शेतकरी सामान्यतः 1 जूनपासून पेरणीला सुरुवात करतात. याच कालावधीत मान्सून भारतात प्रवेश करतो. पेरणीचा हा हंगाम ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहतो.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात दीर्घ कालावधी सरासरीच्या (LPA) 96% पाऊस होऊ शकतो. LPA च्या 90-95% झालेल्या पावसाला सामान्याहून जास्त पाऊसमान म्हटले जाते. तर 110% पेक्षा जास्त पावसाला अतिवृष्टी व 90% पेक्षा कमी पावसाला दुष्काळ म्हटले जाते.
पावसावर परिणाम करणारे 'ला निना' व 'एल निनो' म्हणजे काय?
ला निनामध्ये समुद्राचे पाणी वेगाने थंड होते. ला निनाचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामुळे आकाशात ढग येऊन पाऊस पडतो. भारतातील कमी-अधिक प्रमाणात पडणारा पाऊस, थंडी व उन्हाळा ला निनावरच अवलंबून असतो. भारतात ‘ला निना’मुळे थंडी व पावसाची शक्यता असते.
ला निनासारखाच अल निनोचाही जगभरातील हवामानावर प्रभाव पडतो. त्यात समुद्राचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढते. त्याचा परिणाम 10 वर्षांत दोनदा होतो. याच्या प्रभावामुळे जास्त पावसाच्या भागात कमी, तर कमी पावसाच्या भागात जास्त पाऊस पडतो. ‘अल निनो’मुळे भारतात अनेकदा मान्सून कमकुवत होतो. यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते.
अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या पावसाची गरज
देशात वर्षभर जेवढा पाऊस होते, त्यापैकी 70% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. आजही आपल्या देशातील 70% ते 80% शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णतः चांगल्या किंवा वाईट पावसावर अवलंबून असते. पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस झाला तर त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 20% च्या आसपास आहे. कृषी क्षेत्र आपल्या देशातील निम्म्या लोकसंख्येला रोजगार प्रदान करते. त्यामुळे चांगला पाऊस म्हणजे यंदा निम्म्या लोकसंख्येच्या उत्पन्नात सणासुदीपूर्वी चांगली वाढ होऊ शकते. यामुळे त्यांची त्यांची खर्च करण्याची क्षमताही चांगलीच वाढेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.