आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 80 हजार 953 झाला आहे. बुधवारी गुजरातमध्ये 510, राजस्थान 123, पश्चिम बंगाल 343 आणि बिहारमध्ये 128 रुग्ण आढळले. हे आकडे covid19india.org नुसार आहेत. यात चांगली बाब म्हणजे, देशात अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासात 5991 कोरोना रुग्ण ठीक झाले. आतापर्यंत 1,37,840 संक्रमित ठीक झाले आहेत, तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1,33,632 झाली, तर रिकवरी रेट 48.88% झाला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांना अपील केली आहे की, विना कारण गर्दी करू नका. नाहीतर लॉकडाउनमध्ये दिलेली सूट परत गेतली जाईल.तिकडे, उत्तरप्रदेशमध्ये बुधवारी 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. बुधवारी तमिळनाडुत एक दिवसातील सर्वाधिक 1925 नवीन रुग्ण आढळले, तर19 मृत्यू झाले.
कोरोनाग्रस्त द्रमुक आमदाराचा मृत्यू
देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे एका आमदाराचे निधन झाल्याचे वृत्त बुधवारी समोर आले आहे. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कडघमचे आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 2 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर डॉ. रेला इंस्टिट्युट अँड मेडिकल सेंटरमध्ये उपचार केले जात होते. कोरोनामुळे त्यांना न्युमोनिया झाला होता. यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यासह अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले. परंतु, सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
उपचाराच्या नावाखाली उकळले 12.23 लाख रुपये
कोरोना उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांचा खेळ परत एकदा समोर आला आहे. सूरतमधील एका ट्राय स्टार हॉस्पीटलमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांकडून कोरोनाच्या उपचाराछ्या नावाखाली 12.23 लाख रुपये वसूल करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये रुग्णावर 24 दिवस उपचार करण्यात आला, तरीदेखील रुग्ण पूर्णपणे ठीक झालेला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.