आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा लाटा थंडावल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवर पुन्हा एकदा बनावट नोटांचा धंदा धडाक्यात सुरू झाला आहे. या गोरखधंद्यात दुबई, मलेशिया, बांगलादेश व पाकिस्तानचे तस्कर आहेत. मोठा अड्डा नेपाळच्या परसा व बारा जिल्ह्यात आहे. म्होरक्या दुबईत आहे. जवळपास 80 कोटी बनावट नोटांची खेप नेपाळमध्ये पोहोचली आहे. दीपावली-छटनंतर होळीपर्यंत बाजारपेठेत रोकड वाढेल. त्या तुलनेत या बनावट नोटाही लोकांच्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला जाईल.
या गोरखधंद्याची पडताळणी करण्यासाठी दिव्य मराठीच्या टीमने भारत-नेपाळमध्ये 1000 किमीचा प्रवास केला. तस्करांपर्यंत पोहोचण्यासाठी 30 जणांची भेट घेतली. त्यात आम्हाला या प्रकरणी तुरुंगवास भोगललेले अनेकजण भेटले.
गुन्हेगार बनून मोठ्या म्होरक्याची भेट
अनेक प्रयत्नांनंतर दिव्य मराठीच्या टीमला नकली नोटांच्या एका मोठ्या व्यावसायिकापर्यंत पोहोचण्यात यश आले. आम्ही त्याची एक गुन्हेगार म्हणून भेट घेतली. आम्ही म्हणालो की, आम्हाला मोठे काम करायचे आहे. त्यासाठी आम्हाला मोठी रकम हवी आहे. तुम्ही किती बनावट नोटा देऊ शकता.
या व्यावसायिकाला आमच्यावर विश्वास बसल्यानंतर त्याने एक व्हिडिओ दाखवला. त्यात 2 सूटकेसमध्ये 100, 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटांचे जवळपास 80 कोटी होते. त्याने सांगितले की, प्रिंटिंग पाक, मलेशिया, दुबई व बांगलादेशात होते. त्यानंतर ते श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, यूएई व मलेशियामार्गे नेपाळला पोहोचते.
100 च्या नोटेत 6 पट फायदा
100 ची पत्ती म्हणजे 100 रुपयांची नोट. ISI पासून भारतीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी 100 रुपयांच्या एका नोटेचा 6 पट फायदा होतो. आयएसआय 100 रुपयांची नोट अवघ्या 25 रुपयांत तस्करांपर्यंत पोहोचवते. तेथून ते ठोक तस्कराला 30 रुपयांत मिळते. त्यानंतर फुटकळ तस्कर सौदेबाजी करून ही नोट 35 ते 40 रुपयांना विकतो. जेवढी मोठी नोट, तेवढा मोठा फायदा, असे हे समीकरण असते.
हिंदू तस्कर-मुस्लिम चेहरा, मुले कॅरिअर
बनावट नोट तस्करी करणाऱ्या म्होरक्याचा जाती-धर्मावर मोठा विश्वास असतो. त्यामुळे अनेक हिंदू तस्कर मुस्लिम म्हणून धंदा करतात. नेपाळमध्ये राहणारा अभिषेक तिवारी दुबई व बांगलादशात अस्लम म्हणून संवाद साधतो. तो कुणाचे नाव घेण्यासाठी नोटा, सोणे, ड्रग्ज आदींची माहिती देतो-घेतो. नोटांची खेप भारतात पाठवण्यासाठी कॅरिअर म्हणून मुलांचाही वापर केला जातो. दसरा, दीपावली, छटमध्ये खरेदी-विक्री वाढते. त्यामुळे नकली नोटा छापण्याची तयारी ऑगस्टपासूनच सुरू होते.
नेपाळमध्ये तुरुंगातून सुरू नकली नोटांचा गोरखधंदा
नेपाळचे खासदार मिर्झा दिलशाद बेग यांची 1998 मध्ये हत्या झाल्यानंतर तिथे डी कंपनी व आयआसआयचे काम लाल मोहम्मद सांभाळत होते. त्याची 19 सप्टेंबर 2022 रोजी हत्या झाली. आता या कामासाठी आयएसआय नव्या चेहऱ्याचा शोध घेत आहे.
सद्यस्थितीत नेपाळमध्ये नकली नोटा, सोणए व ड्रग्जच्या धंद्यातील सर्वात मोठे नाव अल्ताफ मियां व यूनुस अंसारीचे आहे. दोघेही तुरुंगातून हा उद्योग चालवतात. आयएसआय अल्ताफवर बाजी लावण्याचा प्रयत्न कतर आहे. दुबईतील गँगचा म्होरक्याही अल्ताफकडे त्याच्याकडे नेपाळची सूत्रे सोपवण्यास अनुकूल आहे.
नवे आव्हान - नेपाळ मार्गे नकली डॉलर्स
मोठे उद्योगपती नंबर दोनचे उत्पन्न लपवण्यासाठी अमेरिकन डॉलर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यांना डॉलर्सही फेक असल्याचे ठावूक नसते. नेपाळमध्ये बनावट डॉलर्सची खेपही जगातील अनेक देशांत पाठवली जाते.
बटाट्याचे पोते व कापड्यांच्या गठ्ठ्यांतून तस्करी
महिला, मुले काही पैशांच्या लालसेपोटी सीमेच्या पलिकडे नकली नोटांची खेप पाठवण्याची तस्करी करतात. छोट्या पॉलीथिनध्ये दोन-तीन लाख नकली नोट पोहोचवण्याच्या मोबदल्यात महिला व मुलांना 500 ते 1 हजार रुपये दिले जातात.
10 ते 20 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेची तस्करी बटाट्यांचे पोते किंवा कापडाच्या गठ्ठ्यांतून केली जाते. हे बंडल पॅक करून ते पॉलीथिनने झाकले जाते. यामुळे ते चेकिंगमध्ये सहज पकडले जात नाही. तस्कर पायवाटांसह शेतांचाही वापर करतात. पायी किंवा सायकलने तस्करीचे सामान सीमेपार नेले जाते. तेथून चारचाकींतून वेगवेगळ्या राज्यांत पोहोचवले जाते.
दिव्य मराठी अशी पोहोचली तस्करांपर्यंत
नकली नोटांची खेप नेपाळहून वीरगंज, रुपनदेही, सनौली, सिद्धार्थनगरच्या बढनी सीमेहून भारतात येते. नकली नोटांच्या या गोरखधंद्याचा व्हिडिओ दाखवल्यानतंर ओरिजनल व ट्रायलच्या आधारावर होतो. ग्राहकाला फेक करेंसच्या व्यवसायात ओढण्यापूर्वी त्याला तस्करीचे व्हिडिओ दाखवले जातात.
तस्करांशी संपर्क साधण्यासाठी दिव्य मराठीच्या टीमने 30 जणांची भेट घेतली. असे अनेक तस्करही सापडले, जे बनावट नोटांच्या धंद्यात तुरुंगात गेले होते. पण, या लोकांनी आता फक्त भारतीय गुप्तचर संस्थेला माहिती पुरवत असल्याचे सागून बोलण्यास नकार दिला. पण, नेपाळ व रक्सौलमध्ये सातत्याने संपर्क साधल्यानंतर बनावट चलनाचा एक जुना तस्कर भेटला.
2 तासांच्या संभाषणानंतर त्याने एक व्हिडिओ दाखवला. त्यात 2 सुटकेसमध्ये 100, 200, 500, 2000 च्या नोटांचे 80 लाख रुपये होते. आम्ही चिठ्ठी दाखवायला सांगितली. खूप आढेवेढे घेतल्यानंतर तो तयार झाला. रात्री 10.30 वाजता फोन करून एका ठिकाणी बोलावून पाच-पाचशेच्या 11 बंडलांमध्ये साडेपाच लाख रुपये आणून समोर ठेवले.
आम्ही नोटांची खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्याने 40 रुपयाला 100 रुपयांची नकली नोट देण्याचे मान्य केले. साडेपाच लाखांच्या बनावट चलनाच्या बदल्यात दीड लाख भारतीय रुपयांची मागणी केली. आम्ही त्याला बॉसला विचारून सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली. यावेळी झालेल्या चर्चेत त्याने अफरोज नामक आणखी एका तस्कराची माहिती दिली. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही तो भेटला.
त्यानंतर टीम नेपाळच्या वीरगंज येथील एका हॉटेलमध्ये पोहोचली. बर्याच प्रतीक्षेनंतर अफरोज तिथे पोहोचला. तो आम्हाला वीरगंजपासून 40 किमी दूर असलेल्या सुवैथवा गावात घेऊन गेला. वाटेत तस्कराने व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली.
नोट कुठून येते? कुठे छापली जाते व कुठे पुरवले जाते? हे सांगितले. सुवैतवा येथे पोहोचल्यानंतर तस्कराने आम्हाला एका बांधकाम सुरू असलेल्या खोलीत बसवले. 45 मिनिटांनंतर त्याने पॉलिथिनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे 3 बंडल आणले. प्रत्येक बंडलासाठी 15,000 रुपयांच्या खऱ्या नोटा मागितल्या. टीमने हे पैसे सीमेपलीकडे भारतात पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कमिशन वाढवून प्रति बंडल 20 हजार रुपये केले.
त्यानंतर टीमने आपल्या वरिष्ठांना दाखवण्यासाठी काही सॅम्पल नोटा देण्याची मागणी केली. त्याने स्पष्ट नकार दिला. परिणामी, दुसऱ्या दिवशी येतो असे सांगून दिव्य मराठीची टीम रक्सौलला परतली. दुसऱ्या दिवशी, नेपाळ-भारत सीमेवर (महदेवा-सहदेवा गाव) मुलांकरवी पाठवलेल्या नोटांचा नमुना त्याला मिळाला.
नेपाळ पोलिसांसमोरूनच नमुना भारतात पोहोचला
एका बाजूला एसएसबी कॅम्प होता, तर दुसऱ्या बाजूला नेपाळ पोलिसांचे जवान उभे होते. नेपाळ पोलिसांसमोर बनावट नोटांचा नमुना घेऊन टीम भारताच्या हद्दीत दाखल झाली. या पडताळणीत आयएसआय व दाऊद इब्राहिमची टोळी एजंटांमार्फत भारतात बनावट नोटांचा पुरवठा करण्यासाठी कमिशनवर एजंट ठेवत असल्याचीही माहिती मिळाली. प्रत्येक 100 रुपयांमागे 25 ते 30 टक्के कमिशन दिले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.