आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:जगात चाचण्यांच्या बाबतीत भारत आता दुसऱ्या स्थानी, 11.6% लोकसंख्येच्या आतापर्यंत चाचण्या

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारीपासून लसीकरण सुरू होईल : डॉ. हर्षवर्धन

देशात कोरोना रुग्णांची संख्या १,००,५२,९०६ झाली आहे. मात्र दिलाशाची बाब म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्याही ९६ लाखांवर गेली असून फक्त ३.०५ लाख लोकांवरच उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची ही संख्या जगातील एकूण उपचार सुरू असलेल्या लोकांच्या (२,१२,६१,७०४) १.४३% आहे. देशात सर्वाधिक ६२,४७३ सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत, ते एकूण रुग्णांच्या २०.५% आहेत. केरळमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक ६१,६२० रुग्ण आहेत. ते एकूण रुग्णांच्या २०.१% आहेत. आयएमसीआरनुसार कोरोना चाचण्यांचा आकडा १६ कोटी ११ लाखांवर गेला आहे. त्यासोबत चाचण्यांच्या बाबतीत जगात चीनला (१६ कोटी) मागे टाकून भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. आता भारतापेक्षा जास्त चाचण्या फक्त अमेरिकेने (२३.२७ कोटी) केल्या आहेत.

जानेवारीपासून लसीकरण सुरू होईल : डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू होईल. ते म्हणाले की, सरकारचे पहिले प्राधान्य लसीद्वारे सुरक्षितता आणि परिणाम हे आहे.

बातम्या आणखी आहेत...