आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India : Only 101 Hospitals Have Specialist Doctors Of All Types, Of Which 52 Are From The Southern States

अहवाल:फक्त 101 रुग्णालयांत सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर, पैकी 52 दक्षिण राज्यांची; देशातील सरकारी जिल्हा रुग्णालयांवर नीती आयोगाचा अहवाल

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यातही दक्षिण भारतच आघाडीवर, कर्नाटकात अशी ६ रुग्णालये

देशातील सरकारी जिल्हा रुग्णालयांच्या स्थितीवर नीती आयोगाने अहवाल जारी केला आहे. त्यात अनेक धक्कादायक तथ्ये आहेत. जसे- २ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या राज्यांपैकी एकमेव दिल्लीतील जिल्हा रुग्णालयांत १ लाख लाेकसंख्येमागे ५० पेक्षा जास्त बेड्स आहेत. तेथे एक लाख लोकांमागे ५९ बेड आहेत. इतर कोणत्याही राज्यात हे प्रमाण ३३ बेड्सपेक्षा जास्त नाही. सर्वात वाईट अवस्थ बिहारची आहे. तेथे एक लाख लाेकसंख्येमागे केवळ ६ बेड्स आहेत. विशेष म्हणजे, देशातील एकूण ७४२ जिल्ह्यांपैकी केवळ १०१ जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांत सर्व १४ प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर तैनात आहेत. पैकी ५२ रुग्णालये दक्षिणेकडील ६ राज्यांची आहेत. म्हणजे सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स असलेली देशातील निम्मी रुग्णालये २०% लोकसंख्येच्या दाक्षिणात्य राज्यांत आहेत.

नीती आयोगाने जिल्हा रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांचे विश्लेषण केले. त्यात समाेर आले की, तामिळनाडूत प्रत्येक सरकारी डॉक्टर ओपीडीत रोज सरासरी ४७ पेशंट्स बघतो, तर हरियाणात ही सरासरी २७ आहे.

यातही दक्षिण भारतच आघाडीवर, कर्नाटकात अशी ६ रुग्णालये
दिल्ली, महाराष्ट्र, मिझोराम, राजस्थान, तामिळनाडू व दादर-नगर हवेलीत फक्त १-१ रुग्णालय आहे. तेथे कार्डियाक इन्व्हेस्टिगेशन, बायोकेमिस्ट्री, मल-मूत्रसारख्या एकूण १४ प्रकारच्या तपासण्या होतात.

कर्नाटक 6

तेलंगण 4

आंध्र 3

गुजरात 2

बातम्या आणखी आहेत...