आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Overtakes Russia To Become World's Third Most Infected Country Corona Virus

कोरोनाचा स्फोट:रशियाला मागे टाकत जगातील तिसरा सर्वात जास्त संक्रमित देश बनला भारत, गेल्या 10 दिवसात झपाट्याने वाढले रुग्ण 

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियामध्ये आतापर्यंत 6 लाख 81 हजार 251 संक्रमित सापडले, यामधील 4 लाख 50 हजार 750 रुग्ण झाले बरे
  • भारतात आतापर्यंत 6 लाख 95 हजार 396 संक्रमित, यामधील 4 लाख 09 हजार 083 रुग्ण झाले बरे

रविवारी भारतातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येने रशियाला मागे टाकले आहे. भारतात 6 लाख 95 हजार 396 रूग्ण झाले आहेत. तर रशियामध्ये 6 लाख 81 हजार 251 रूग्ण आहेत. यासह, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा संक्रमित देश बनला आहे. गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात झपाट्याने रुग्ण वाढली आहेत. रशियामध्ये, जेथे 67 हजार 634 प्रकरणे आढळली, भारतात 2 लाख 919 प्रकरणे नोंदवली गेली.

भारतात 6.95 लाख प्रकरणे होण्यासाठी 158 दिवस लागले. दररोज भारतात दररोज सरासरी 22 हजाराहून अधिक नवीन रुग्ण येत आहेत. जूनमध्ये 3 लाख 87 हजार 425 प्रकरणे नोंदवली गेली. 21 जूनपासून दररोज 15 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. त्याचबरोबर 4 जुलै रोजी येथे सर्वात जास्त  24 हजार 18 रुग्ण आढळले.

मे महिन्यात रशियामध्ये सर्वाधिक रुग्ण 

मे महिन्यात रशियामध्ये सर्वाधिक संक्रमण झाले. या महिन्यात येथे 2 लाख 91 हजार 412 प्रकरणांची पुष्टी झाली. 11 मे रोजी येथे सर्वाधिक 11 हजार 656 प्रकरणे आढळली.

भारतात 110 दिवसांत 1 लाख प्रकरणे

30 जानेवारी रोजी भारतात संसर्गाची पहिली घटना उघडकीस आली. 110 दिवसांनंतर, 10 मे रोजी ही संख्या एक लाखांवर गेली. यानंतर, संसर्ग वेगाने वाढला. हा आकडा अवघ्या 15 दिवसात 2 लाखांच्या पुढे गेला. यानंतर संसर्ग झालेल्यांची संख्या 2 वरून 3 लाखांपर्यंत वाढण्यास केवळ 10 दिवस लागले. 3 चे 4 लाख होणअयासाठी केवळ 8 दिव लागले. तर 4 चे 5 लाख होण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला. तर 5 चे 6 लाख होणअयासाठी केवळ पाच दिवस लागले.

रशियामध्ये 91 दिवसांत 1 लाख प्रकरणे

रशियामध्ये संसर्गाची पहिली घटना 31 जानेवारी रोजी समोर आली. याच्या 91 दिवसांनंतर म्हणजेच 30 एप्रिल रोजी येथे रूग्णांची संख्या 1 लाखांवर गेली. यानंतर, केवळ 11 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी संक्रमित झालेल्यांची संख्या 2 लाखांवर गेली. तर, पुढील 10 दिवस म्हणजेच 20 मे रोजी तीन लाखाहून अधिक रुग्ण झाले. तर 3 चे 4 लाख प्रकरणे होण्यासाठी 11 दिवसांचा (31 मे) ला वेळ लागला. 4 चे 5 लाख प्रकरणे होण्यासाठी 12 दिवस लागले. तर 5 ते 6 लाख होण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागला.

0